Palghar News: In Palghar, the rift continues in the Grand Alliance; Tiredness of leaders for agitation sakal
मुंबई

Palghar News: पालघरमध्ये महायुतीत तिढा कायम; मनधरणीसाठी नेत्यांची दमछाक

महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप आणि ऊमेदवार निश्चित करण्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात | Negotiations for seat allocation and candidates of Maha Vikas Aghadi and Maha yuoti in final stage

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Mokhada News: लोकसभा निवडणुका जाहीर होऊन वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप आणि उमेदवार निश्चित करण्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे.

पालघर लोकसभेसाठी आघाडी ने शिवसेना ऊबाठा चे ऊमेदवार घोषीत केले आहे. मात्र, महायुतीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला ही जागा भाजप ला सोडण्याची नामुष्की आली आहे. मात्र, ऊमेदवारी वरून अजुनही खल मिटलेला नाही. उमेदवारी वरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी नेत्यांना वारंवार बैठका घ्याव्या लागतं आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुरं जुळलेले नाही. त्यासाठी नेत्यांची दमछाक झाली आहे.

मागील निवडणुकीत पालघर लोकसभेतुन शिवसेनेचे राजेंद्र गावीत निवडुन आले होते. यावेळी ही जागा भाजप ला मिळावी म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आग्रहाची मागणी लावुन धरली. अखेर, मोठा खल आणि वाटाघाटी करून शिवसेनेला पालघर ची जागा भाजप ला सोडण्याची नामुष्की आली.

मात्र, उमेदवारी वरून अजुनही युती चे घोडे आडले आहे. एकीकडे राज्यात युती आणि आघाडीचे उमेदवार निश्चितीचा तिढा अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु पालघर च्या ऊमेदवारी चा तिढा अजुनही सुटलेला नाही.

भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी पालघर ची जागा भाजप ला मिळावी तसेच खासदार राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारी ला प्रखर विरोध करत आपली बाजु माध्यमांकडे जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे महायुतीतील वाद उफाळून आला.

दुसरीकडे वसई- विरारमधील भाजप पदाधिकार्यांनी देखील राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारी ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे युतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. हा वाद शमविण्यासाठी युतीच्या नेत्यांना ठिक ठिकाणी बैठका घ्याव्या लागल्या आहेत. त्यानंतर मनोर येथे भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह युतीच्या प्रमुख नेत्यांना मनोमिलन बैठक घ्यावी लागली आहे.

मात्र, या बैठकीतही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारी विरोधात सुरं आळवला आहे. अखेर, नेत्यांना कार्यकर्त्याची मनधरणी करण्यात अपयशच आले आहे. काही दिवसांवर ऊमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येऊन ठेपली आहे. मात्र, युतीचा ऊमेदवारी चा तिढा कायम असल्याने, महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हट्टहास करून पालघर ची जागा शिवसेनेकडून मिळवली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनाच पुन्हा नव्याने भाजप कडून ऊमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यासाठी गावीतांनी देखील भाजपच्या वरिष्ठांकडे धावाधाव केली आहे. ही बाब लक्षात आल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गावीतांच्या ऊमेदवारी ला अधिकच विरोध वाढला आहे. अखेर, मनोरच्या बैठकीत युतीच्या नेत्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणीसाठी " पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ऊमेदवार समजून, एक दिलाने कामाला लागण्याचे केविलवाणे आवाहन करावे लागले आहे. मात्र, तरीही गावीतांच्या ऊमेदवारी ला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोधच राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

SCROLL FOR NEXT