palghar non-conventional energy electricity supply from other districts decrease  Sakal
मुंबई

Palghar News : अपारंपरिक ऊर्जेतून पालघर होणार प्रकाशमय; अन्य जिल्ह्यांतून होणारा वीजपुरवठाही आता घटणार

पालघर जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा सातत्याने होत असतो.

प्रसाद जोशी

पालघर : पालघर जिल्ह्यात वीजपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. जिल्ह्यात कोणत्याही पारंपरिक इंधनाचा वापर न करता निसर्गाच्या घटकांतील स्रोतांचा वापर करून वीज निर्मितीची संकल्पना राबवली जाणार आहे. त्यामुळे पथदिव्यांपासून ते घरोघरी अखंड प्रकाश व ग्रामीण भागात ऊर्जेची गरज निश्चितच भागणार आहे. या उपक्रमामुळे परजिल्ह्यातून होणारा वीज पुरवठा घटणार आहे.

पालघर जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा सातत्याने होत असतो. पावसाळ्यात विजेची परिस्थिती गंभीर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, शेती, तसेच अन्य कामांवर परिणाम होतो.

त्यामुळे जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेतून वीजनिर्मिती असावी, याकरिता पावले उचलली आहेत. यासाठी बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत निर्माण होऊन आदिवासीबहुल भागाला घरोघरी अखंड प्रकाश मिळण्यासाठी शासनदरबारी हाक दिली होती व त्याला यश आले आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल क्षेत्र असून, ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भाग अधिक आहे. महावितरण विभागाकडून वीज वितरित केली जाते, मात्र अनेकदा अंधाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. अशावेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वीज नसल्याने अडचणी येतात.

याचबरोबर सापांचा वापर अधिक असल्याने जर अंधार असेल, तर सर्पदंशाची भीती असते. जनावरांनाही धोका असतो. पायी जाणारे प्रवासी, वाहनचालकांनाही अंधारामुळे गैरसोय होत असते. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत निर्माण झाल्यावर गैरसोयींपासून मुक्ती मिळणार आहे.

पाच कोटींचा निधी मिळाला

बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी गेल्या वर्षी आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालघर ग्रामीण भागात अपारंपरिक ऊर्जेसाठी सरकारकडे मागणी केली होती. त्याला यश आले असून जिल्हा विभागात पाच कोटींचा निधी मिळाला असून, लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू केले जाणार आहे.

ग्रामपंचायतीलादेखील विजेचा वापर शक्य

टप्प्प्याटप्प्याने या कामाला गती मिळणार आहे. यात प्रथम पालघर आणि वसई ग्रामीण भागात वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीलादेखील विजेचा वापर करता येणार असून, पथदिवेही उजळणार आहेत. पर्यावरणाला पूरक असणारे सौरदिवे, पथदिवे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना व प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहेत.

अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत हा पालघर जिल्ह्याला व्हावा, यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्यासाठी निधी आला असून, लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेकडून प्रभावीपणे कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे विजेमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल.

- राजेश पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT