Palghar water Problem  sakal
मुंबई

Palghar: दमदार पाऊस न झाल्याने पालघरमध्ये भीषण पाणी टंचाई, 88 गावांना टॅंकरद्वारे पुरवठा! 

Heavy Rain: जुन महिन्याच्या अखेरीस तालुक्यात 26 टॅंकरद्वारे 88 गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे.

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Mokhada: प्रतिवर्षी मोखाड्यात पाणी टंचाई ऊदभवते. त्यावर अनेक ऊपाययोजना करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. मात्र, सर्व योजना कुचकामी ठरल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा हाच एकमेव ऊपाय वर्षानुवर्षे सुरू आहे.

यंदा दमदार पावसाला सुरुवात न झाल्याने, गतसालच्या तुलनेने पाणी टंचाई लांबली आहे. ऐन पावसाळ्यात तालुक्यात, जुन महिन्याच्या अखेरीस तालुक्यात  26  टॅंकरद्वारे  88  गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. दमदार पावसाअभावी तालुक्यात पेरणी ही खोळंबली आहे.    

दरवर्षाप्रमाणे यंदा ही मोखाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली. मात्र, ऊन्हाच्या तडाख्यामुळे एक महिना अगोदरच डिसेंबर  2023  मध्ये तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली. 

मार्च महिना सरताच टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या पन्नाशी पार केली होती. गोळीचापाडा, धामोडी, स्वामीनगर, कुडवा, कुंडाचापाडा, तेलीऊंबरपाडा, वारलीवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, गवरचरीपाडा, ठवळपाडा, राजेवाडी, जांभुळवाडी, हुंड्याचीवाडी, धामणी, तुंगारवाडी, मडक्याचीमेट, कोलद्याचापाडा, चारणगांव, वाकीचापाडा, ठाकुरवाडी, गोमघर, वाशिंद, वाघवाडी आणि शेलमपाडा या गावपाड्यांसह सध्यस्धितीत सुमारे   88   गावपाड्यांना पाणी टंचाई ने ग्रासले आहे. या गावपाड्यांना ऐन पावसाळ्यात   26  टॅंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

दमदार पावसा अभावी पाणी टंचाई लांबली........

मोखाड्यात अजुनही दमदार पाऊस कोसळलेला नाही. सलग पाऊस न बरसता वेगवेगळ्या भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचे झरे सुरू झालेले नाहीत, विहीरी अजुनही कोरड्याच आहेत. परिणामी टंचाई ग्रस्त गावपाड्यांना  टॅंकरद्वारे होणार्या पाणी पुरवठ्यावरच अवलंबून रहावे लागते आहे.

गतसाली नियमीत पावसाळा सुरू झाल्यानंतर   19   जुनला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. या वर्षी अजुनही मान्सून चे आगमन तालुक्यात झालेले नाही तसेच दमदार पाऊस ही झालेला नाही.  जुन महिन्याच्या अखेरीस ही मोखाड्यात पाणी टंचाई कायम आहे. त्यामुळे येथील नागरीकांची तहान भागवण्यासाठी शासनाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागला आहे. 

यंदाची रेकॉर्ड ब्रेक पाणी टंचाई.......

प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाई ला सुरूवात होते. यंदा एक महिना अगोदरच डिसेंबर मध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. गतसाली  23  टॅंकरद्वारे  73  गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा  26  टॅंकरद्वारे  88  गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे.

तालुक्यात कधी नव्हे ऐव्हढ्या सुमारे  50  हजार  494  नागरीक आणि जनावरांची ऐन पावसाळ्यात टॅंकर च्या पाण्याने तहान भागवली जात आहे. जुन महिन्याची अखेर आली तरी तालुक्यात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तब्बल  7  महिने, मोखाड्यात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे यंदाची पाणी टंचाई रेकाॅर्ड ब्रेक बनली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT