Farmers loss sakal media
मुंबई

पनवेलची भातशेती पाण्याखाली; अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २०० हेक्टर पिकाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल : पनवेल (panvel) तालुक्यात यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने (heavy rainfall) हाहाकार उडवला आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे १५० ते २०० हेक्टर भातपिकाचे नुकसान (rice production loss) झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी अधिकारी ईश्वर चौधरी (Eshwar chaudhary) यांनी वर्तवला आहे. भातशेतीच्या नुकसानीची पाहणी (Inspection) करण्यात आली असून, लवकरच अहवाल तहसीलदारांना सादर करणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भात हे पनवेलच्या ग्रामीण पट्ट्यातील महत्त्वाचे पीक आहे. सुरुवातीलाच पाऊस समाधानकारक पडल्याने भातलागवड चांगली झाली होती. परंतु, जूनमध्ये सुरू झालेला पाऊस अजूनही जाण्याचे नाव घेत नाही. दोन महिन्यांपासून तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. तर कधी कधी अतिवृष्टीही होत आहे. यंदा पनवेल तालुक्यात ७ हजार ८०० हेक्टरवर भातलागवड करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली.

त्यात शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहिले. बांध फुटले, उधाणाचे पाणी आले. एवढेच नाही तर त्यामुळे शेतामध्ये माती भरली. परिणामी, शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे साधारण १५० ते २०० हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाल्याचे चौधरी यांनी सांगितले. तालुक्यातील भातशेती संदर्भात नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन करण्यात आली आहे. लवकरच अहवाल तहसीलदारांना सादर केला जाणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भातपिकाच्या क्षेत्रात घट
पनवेल तालुका हे भातपिकाचे कोठार समजले जात होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात असे. परंतु औद्योगिकीकरण व शहरीकरणाच्या उंबरठ्यावर तालुका आल्याने या ठिकाणचे शेती क्षेत्र कमी झाले आहे. तळोजासारखी औद्योगिक वसाहत, पनवेलच्या पूर्व भागात आलेले मोठमोठे गृहप्रकल्प आणि फार्म हाऊस संस्कृतीमुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. यामध्ये दोन वर्षांपासून अवकाळी व चक्रीवादळामुळे नागरिकांचा कल भाजीपाला फळबागाकडे वाढला आहे. परिणामी, यंदा भातपिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे.

"यंदा समाधानकारक पाऊस झाला असला, तरी भातपिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. दोन वर्षांपासून अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा संदर्भात गांभीर्याने विचार करावा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरच पाठवला जाणार आहे."
- ईश्वर चौधरी, तालुका कृषी अधिकारी, पनवेल

"मागील वर्षी अवकाळीमुळे भातपिकांचे खूप नुकसान झाले होते. यंदाही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाही. सध्या भात शेतात उगवायला सुरुवात झाला आहे. पावसाने थोडीशी उघडीप घेतल्यास भात काढणी केली जाणार आहे."
- आत्माराम हातमोडे, शेतकरी, गिरवले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT