मुंबई

पनवेल पालिकेच्या 'या' भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ

गजानन चव्हाण

मुंबई: पनवेल पालिका हद्दीत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 13 दिवसात पालिका हद्दीत 451 व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. 392 व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 8 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल पालिका परिसरात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना पालिका प्रशासनाने माझे कुटुंब माझे जबाबदारी सर्वेक्षणच्या वेळी घरोघरी भेट घेऊन कोरोनाचे रुग्ण साधून त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे पालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमी झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सरकारने अनलॉक केल्यामुळे बाजार, रेल्वे सेवा, बससेवा, सिनेमागृह सुरु केल्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत भर पडताना दिसत आहे. 

घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र  त्याकडे नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. देशात त्यात कोरोनाची लस आल्यामुळे बहुतांश नागरिक कोरोना लस आल्याचे कारण सांगून  मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. मासळी, मटण, भाजी आणि फळ मार्केट आदी ठिकाणी खरेदी करताना अनेक व्यक्ती मास्क वापर करताना दिसून येत तर जण देखावा म्हणून हनुवटीवर घेऊन फिरताना दिसून येते. याविषयी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

पनवेल पालिका हद्दीतील ग्रामीण आणि शहरी भागात काही दादा मंडळीकडून आठवडी बाजार भरविला जातो. त्यावेळी फेरीवाले दाटीवाटीने बसलेले असतात.  खरेदी बहुतांश खरेदी दारांच्या तोंडावर मास्क नसतो. पालिकेने काही दिवस आठवडी बाजारावर निर्बंध घालावे आणि विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई कऱण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केलीये जात आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Panvel municipal corporation corona patients increasing february

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT