culprit arrested sakal media
मुंबई

22 वर्षांपासून उल्हासनगरात राहणारा फरार कैदी गजाआड; गुन्हे अन्वेषणची कारवाई

दिनेश गोगी

उल्हासनगर : पत्नीला जिवंत जाळल्या प्रकरणी गुजरात बडोदा कारागृहात (Gujarat-Baroda Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल मिळताच (Parol prisoner) 22 वर्षांपासून फरार असणाऱ्या आणि उल्हासनगरात (Ulhasnagar) राहणाऱ्या कैद्याच्या मुसक्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या (crime branch police) पोलिसांनी आवळल्याआहेत. या कैद्याला गुजरात पोलिसांच्या (Gujrat Police) सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

गुजरात सुरत मधील लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रमेश उर्फ दिनेश तायडे याने 1995 साली त्याच्या पत्नीला जिवंत जाळून ठार मारले होते. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने तो बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता. 22 नोव्हेंबर 1999 रोजी तायडे याची 15 दिवसांसाठी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. मात्र 15 दिवस होताच तायडे गुजरात मधून फरार झाला होता. गुजरात पोलीस सातत्याने त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध शहरात शोध घेत होते.पण तो 22 वर्ष उलटून गेलेत तरी सापडत नव्हता.

अशात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमीदारकडून खात्रीची माहिती मिळाली की,फरार असलेला बडोदा कारागृहातील कैदी रमेश उर्फ दिनेश तायडे हा कानसई रोडवरील भरत नगरमध्ये राहत आहे.त्यानुसार आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर महाशब्दे,हवालदार मधुकर माळी,शिपाई नवनाथ कोरडे,अर्जुन मुत्तलगिरी आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे मंगेश वीर यांनी पहाटे भरत नगर गाठून तायडे याच्या मुसक्या आवळल्या. कैदी तायडे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गुजरात लिंबायत पोलिसांना कळवली आहे. ते उल्हासनगरला येण्यासाठी निघाले असून तायडेला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे अनिल मांगले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT