मुंबई

कुर्ल्यात मोडकळीस आलेल्या इमारतीचा भाग कोसळला...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- गुरुवारी दुपारी कुर्ल्याच्या मेहताब लेनमध्ये जीर्ण झालेल्या तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळला. ही घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून ढासळलेल्या कोपऱ्याचे रॅबिट उचलण्याचे काम सुरू आहे.

ही इमारत कुर्ला पश्चिमेकडील एल वॉर्ड कार्यालयाच्या बाजूला आहे. एका नागरिकानं दुपारी 12 च्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यात. कित्येक वर्ष जुनी झालेल्या या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले होते.

या इमारतीत काही कुटुंबिय वास्तव्यास होते. या घटनेनंतरर इमारत रिकामी करण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पालिका नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे. सध्या ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरु आहे. पहाटेपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होतं. मुंबईतल्या दादर, माटुंगा, लालबाग, परळ, अंधेरी, मालाड, कुर्ला या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली.

part of building collapsed in mumbais kurla area no injuries reported

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT