मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली. आजोबांनी फटकारल्यानंतर नातू पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. पार्थ पवार नाराज असल्याचं वृत्त जयंत पाटील यांनी फेटाळून लावले आहे. अजित पवार किंवा पार्थ पवार हे नाराज नाहीत त्यामुळे मानण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
पार्थ पवार आणि त्यांचे अजित पवार नाराज नाहीत. शरद पवार हे आजोबा आहेत. आजोबांना बोलण्याचा अधिकार आहे. कुटुंबातील कोणी वडिलधारी व्यक्ती काही बोलली तर आपण नाराज होतो का?,' असा प्रश्न जयंत पाटील यांनी करत नाराजीनाट्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.पार्थ पवार कुठला निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असंही ते म्हणालेत.
हेही वाचाः दुसऱ्या टप्प्यातील इमारतींमधील सिरो सर्व्हेक्षणाआधी BMC कडून केलं जातंय 'हे' महत्त्वाचं काम
पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळं लवकरच या वादावर पडदा पडणार असल्याचं शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळपास सव्वा दोन तास शरद पवार, सुप्रिया सुळे यांची पार्थ पवारांशी चर्चा सुरु होती. . त्यानंतर पार्थ पवार सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले.
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी CBI द्वारे करण्याची मागणी केली होती. पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही.
सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. मात्र त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.
parth pawar upset on sharad pawar statement ncp leader jayant patil Revealed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.