Parth Pawar - Shrikant Shinde 
मुंबई

Parth Pawar मुख्यमंत्र्यांच्या घरी; श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत घेतलं बाप्पाचं दर्शन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या गणेशोत्सव सुरू आहे. मात्र हा गणेशोत्सव राजकीय पातळीवर सुरू झालेल्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळेत गाजत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पुत्र पार्थ पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

सध्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत सर्वच नेते एकमेकांकडे जात आहे. मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जावून गणपतीचे दर्शन घेतले होते. तर मुख्यमंत्री शिंदे देखील दररोज विविध गणेश मंडळांनी आणि नेत्यांच्या घरी स्थापन गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाताना दिसत आहेत.

दरम्यान पार्थ पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पार्थ पवार हे मावळमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र पार्थ यांनी काही बाबतीत पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पार्थ यांची कानउघाडणी केली होती. त्यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान पार्थ यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जावून बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी श्रीकांत शिंदे उपस्थित होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT