passengers oppose over badlapur railway station platform no 1 close railway  Sakal
मुंबई

Badlapur Railway Station : होम प्लॅटफॉर्म अरुंद असताना एक नंबर प्लॅटफॉर्म बंद करु देणार नाही, प्रवासी संतप्त!

आधी प्रवाशांना विचारात घ्या, प्रशासनाने येऊन परिस्थिती बघा प्रवाशांचे आवाहन!

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर : रेल्वे स्थानकातील क्रमांक एक प्लॅटफॉर्म चा विषय आता चिघळत जात असून, प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर प्रवासी संतप्त झाले आहेत. आम्ही हे काम होऊ देणार नाही,

प्रशासनाने आधी येऊन इथल्या परिस्थितीची पाहणी करावी, प्रवाशांना विचारात घ्यावे आणि मगच निर्णय घेण्याची घाई करावी असे आवाहन बदलापूर रेल्वे प्रवासी संघटना व प्रवाशांकडून केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने विकास कामांचा मुद्दा पुढे घेत, रेल्वे प्रशासनाने बदलापूर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक नंबर प्लॅटफॉर्म बंद करणार असल्याचा निर्णय देताच, या निर्णयावर रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत.

यावर आज सकाळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ९.२९ च्या बदलापूर ते सीएसएमटी ट्रेन ने जाणाऱ्या प्रवाशांनी या निर्णयावर नाराजी दर्शवत हा निर्णय म्हणजे प्रशासनाचा तुघलकी निर्णय असून, प्रशासनाने असे निर्णय घेण्यापूर्वी येथील परिस्थितीची पाहणी करुन, प्रवाशांना विचारात घेणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.

बदलापूर शहरातील व रेल्वे प्रवास करताना रोज वाढणारी गर्दी यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून होम प्लॅटफॉर्म ची मागणी होत होती जेणेकरुन ही गर्दी विभाजित होऊन ट्रेन मध्ये चढणे उतरणे सोपे जाईल.

यात रेल्वे प्रशासनाने वर्षानुवर्षांच्या मागणी नंतर ६ ते ७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होम प्लॅटफॉर्म ची मागणी पूर्ण केली मात्र, आता आधी पासून असलेले एक नंबर प्लॅटफॉर्म प्रशासन बंद करत असलेला निर्णय हा अतिशय चुकीचा आहे.

मुळात होम प्लॅटफॉर्म ची पाहणी केली तर समजून येईल की, हा प्लॅटफॉर्म एक, दोन आणि तीन नंबरच्या प्लॅटफॉर्म पेक्षा खूपच अरुंद आणि त्याचे अद्याप आहे तेवढे काम पण पूर्ण न झाल्याने, होम प्लॅटफॉर्म वरुन प्रवास करणे, ट्रेन पकडणे हे खूप क्लिष्टदायक आहे.

त्यामुळे रोज या प्लॅटफॉर्म वरुन गाडी पकडताना अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निदान या सगळ्या परिस्थितीचा विचार करुन रेल्वे ने निर्णय घेणे गरजेचे होते असे बदलापूरच्या प्रवशांचे मत आहे.

काय आहे नक्की प्रकरण?

बदलापूर रेल्वे स्थानकात नूतनीकरण व अद्ययावतीकरण करण्याच्या उद्देशाने सीएसएमटी कडील दिशेपासून ते कर्जत दिशेपर्यंत सलग दोन १२ मिटर लांबीचे पुल बांधण्यात येत असून, या पुलांवरून प्लॅटफॉर्म वर उतरण्यासाठी तीनही प्लॅटफॉर्म वर एकूण मिळून ६ सरकते जिने,

व तीन लिफ्ट तसेच पादचारी जिने यांची सोय केली जात आहे. मात्र हे सगळं करत असताना, सरकते जिने व लिफ्ट उतरण्यासाठी एक व दोन नंबर प्लॅटफॉर्म वर जागा अपुरी पडत असल्याने, दोन्हीकडील एक प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

प्रवासी प्रतिक्रिया

या सगळ्या प्रकारात राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप व त्यांच्याकडून खरंतर बदलापूरच्या प्रवाशांची दिशाभूल होत आहे. कारण, काही लोक प्रतिनिधी हे रेल्वे चे काम पूर्ण झाल्यावर एक नंबर वर घालण्यात आलेले कुंपण काढून टाकण्यात येईल असे सांगत आहेत.

मात्र जी विकास कामे केली जात आहेत त्या नुसार रेल्वे ने पारित केलेल्या निर्णयात फलाट क्रमांक एक हा कायमस्वरूपी बंद होणार असे नमूद असताना ही, ही चुकीची माहिती देऊन राजकीय पुढारी प्रवाशांची दिशाभूल करत आहेत.

मुळात त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन रेल्वे स्थानकाची पाहणी करावी, आधी आम्हाला सकाळची सगळी गर्दी मावेल या धर्तीवर होम प्लॅटफॉर्म तयार करुन द्यावे मगच हा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही, घटनेच्या मार्गाने जाऊन हे काम बंद करण्यासाठी अमरण उपोषण व शांततेच्या मार्गाने का होईना आंदोलन करु.

- राजेंद्र नरसाळे रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष बदलापूर

रेल्वे प्रशासनाने आणि राजकीय पुढाऱ्यांनी पहिले येऊन होम प्लॅटफॉर्म ची पाहणी करावी, होम प्लॅटफॉर्म च्या मधल्या भागात असलेल्या तिकीट घराबाहेर प्लॅटफॉर्म वर चार माणसे उभे राहू शकतील इतकीच जागा आहे. व संपूर्ण होम प्लॅटफॉर्म हे खूपच अरुंद आहे त्यामुळे यावरून सकाळी गर्दीच्या वेळी आम्ही प्रवास कसा करायचा? ट्रेन कशी पकडायची हे सांगावं.

- अंकिता देवळे महिला प्रवासी

ज्या राजकीय पुढाऱ्यांनी कधीच रेल्वे ने प्रवास केला नाही, ज्यांना सकाळच्या गर्दीच्या वेळची परिस्थिती माहित नाही त्यांनी या निर्णयाचे स्वागत आणि पाठिंबा देणे हे आमच्यासाठी हास्यास्पद आहे. निदान आमच्या अडचणी ओळखून आधी आम्हाला रुंद आणि त्रास न होता प्रवास करण्यासाठी चांगल्या प्लॅटफॉर्म ची सोय करुन द्या मगच असे निर्णय घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Baramati: राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची; शर्मिला पवार व अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर...

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT