मध्य रेल्वेवरील वासिंद ते खडवली दरम्यान दुपारच्या एक वाजताचा सुमारास पवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती.
मुंबई - मध्य रेल्वेवरील वासिंद ते खडवली दरम्यान दुपारच्या एक वाजताचा सुमारास पवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली होती. त्यामुळे कल्याण ते कसाराकडे जाणारी जाणारी एक्सप्रेस सेवा तर, उपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. मात्र, अवघ्या काही मिनिटात बिघाडा दुरुस्त करून पवन एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वासिंद-खडवली दरम्यान पवन एक्सप्रेसच्या इंजिनचा प्रेशर पाईप फाटल्याने मध्य रेल्वेची कसारा दिशेची वाहतूक गुरुवारी पुन्हा एकदा मंदावली होती. त्यानंतर पवन एक्सप्रेसला वसिंद स्थानक आणून दुरुस्त करण्यात आहे. सकाळी एन-१२ लोकल ला आग लागण्याची घटना ताजी असतानाच दुपारी १ वाजता सदर घटना घडल्याने मध्य रेल्वे कल्याण कसारा मार्ग पुन्हा एकदा मंदावला आहे.
दररोज अश्या घटना घडत असल्याने कल्याण -कसारामार्गावर नेहमी लोकल सेवा उशिरा धावत आहेत. तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. ते युद्धपातळीवर सुरू व्हावे ही मागणी नेहमी होत असताना रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांत प्रचंड नाराजी असल्याचे कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे प्रसिद्धिप्रमुख महेश तारमले यांनी सांगितले. तसेच रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन नवीन रेल्वे मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू करावे याबाबत लवकरच अधिकारी वर्गाचे आणि लोकप्रतिनिधींची भेट घेणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.