मुंबई : कुठे साप घरात घुसलेला असो की घोरपड, कुठे कबुतर अडकले असेल तर कुठे मांजात अडकलेला पक्षी, कधी हरिण जखमी मिळते तर मोर आढळून येतो. या सर्व वन्यजीवांचे प्राण वाचवण्यात 'पॉज' (प्रोग्रेसिव्ह अॅनिमल वेल्फेअर सोसायटी) संस्थेला यश आले आहे. गेल्या 20 वर्षात संस्थेने आतापर्यंत 1061 साप, 2267 पक्षी, 13 माकडे, 3 कोल्हे, 60 कासवे, 31 विविध सरपटणारे प्राणी ज्यात घोरपड, पाली, रंग बदलणारे सरडे आदी 20 खारी, वटवाघूळ, विंचू इत्यादी वन्यजीवांची सुटका आणि पुनर्वसन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त पक्षी पॉज संस्थेकडे पुनर्वसनासाठी येतात. त्यामध्ये पाण्याजवळील पक्षी, शहरी पक्षी, जंगली पक्षी, गवताळ पक्षी यांचा समावेश असतो. अगदी स्थलांतरित पक्षी जसे फ्लेमिंगो, चातक, तीन बोटी खंड्या असे दुर्मिळ पक्षी देखील पॉज संस्थेने पुनर्वसित केले आहेत. विविध बदके, बगळे, सागरी ससाणे ते अगदी शहरातील कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घारी, कोकिळा यांना वेळोवेळी वाचवले आहे.
प्रत्येक प्रजनन काळात संस्थेने छोट्या पिल्लांना त्यांच्या घरट्यात सोडण्याचे काम केले आहे आणि कधी पक्ष्यांची कॉलनी जर झाड पडल्याने विखरली गेली असेल तर वनविभागाला आणि एसपीसीऍच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखलही केले आहे. विविध साप आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यासाठी संस्थेकडे विशेष हेल्पलाईन (9920777536) आहे.
संस्थेने वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरच्या मदतीने विविध पक्ष्यांवर उपचारही केले आहेत. नुसते स्थलांतरित आणि देशी पक्षी पॉजमध्ये येत नाहीत तर विदेशी (एक्सओटीक) पक्षी देखील संस्थेत येतात. अगदी लवबर्ड ते टर्की आणि आफ्रिकन पोपट सुद्धा लोक आणून देतात. कधी पिंजरा उघडून पळून गेलेले पक्षी सुद्धा येतात. त्या पक्ष्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते तर लहान पिलाला तात्पुरते पालकही दिले जातात.
त्यामधून नाग, फुरसे, मण्यार, घोणस हे विषारी साप तसेच नेहमी आढळणारे धामण, कवड्या, नानेट्या यांचे रिलोकेशन केले जाते. आतापर्यंत बऱ्याच घोरपडी, पाली, रंग बदलणारे सरडे संस्थेने पुन्हा निसर्गात सोडले आहेत.संस्थेला वन्यजीवासाठीही कॉल येतात. यात हरिण, माकड, कोल्हे, ससे, खारी, वटवाघूळ इत्यादी वन्यप्राणी यांची सुटका आणि उपचार केले आहेत. संस्थेकडे वन्यजीव ने-आण करण्यासाठी 1 रुग्णवाहिकाही आहे.
भीक्षेसाठी फिरणाऱ्या हत्तींवर अंकुश
पॉज संस्थेकडे ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त साधने उपलब्ध आहेत आणि त्यातील बरीच साधने ही स्कॉटलंड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केली आहेत. 2010 मध्ये संस्थेने डोंबिवलीमधील सर्पमित्रांची एक सभा देखील आयोजित केली होती. तर 2018 मध्ये निलेश भणगे यांनी सर्पविषयक डेटावर सर्प संमेलनामध्ये सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले होते. भणगे यांनी 2005 पासून पाळीव हत्ती या विषयावर संशोधन केले असून महाराष्ट्र आणि गोवामधील पाळीव हत्तींचा अभ्यास करून न्यायालयामध्ये अहवाल सादर केले आहेत. त्यांच्या संशोधनाचे 5 अहवालही प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये सर्कशीतील हत्ती, मंदिरमधील हत्ती, रस्त्यावरील हत्ती, सर्कशीमधील हत्ती आणि जंगलामधील हत्ती यांचा समावेश आहे. आज त्यांच्या प्रयत्नांनीच रस्त्यावर भीक मागून फिरणारे हत्ती आता बंद झाले आहेत.
-----------------------
(संपादन : प्रणीत पवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.