मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणः तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

- सुनीता महामुणकर

मुंबई : गेल्या वर्षी जातीवाचक शेरेबाजीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर पायल तडवी प्रकरणातील तीन डॉक्टर आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तीनही आरोपी त्यांचे उर्वरित वैद्यकीय शिक्षण नायर रुग्णालयात पूर्ण करु शकतात, अशी परवानगी न्यायालयाने दिली आहे. 

पायलने नायर रुग्णालयातच मागील वर्षी मेमध्ये आत्महत्या केली होती. तिनही आरोपींनी पायलचा सतत जातीवाचक शेरेबाजी करून आणि तिला अपमानास्पद वागणूक देत होत्या. त्यांच्या छळाला कंटाळून तिनं रुग्णालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली, असे पोलिस फिर्यादीमध्ये म्हटले आहे. 

सध्या तिघींनाही जामीन मंजूर झाला आहे. मात्र पुढील शिक्षण घेण्यासाठी आणि नायर रुग्णालय परिसरात प्रवेश करण्याची मनाई केली होती. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर गुरुवारी न्या. उदय ललित, न्या विनित सरन आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

न्यायालयाने आरोपी डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल आणि भक्ती मेहेरे यांना पुढील शिक्षणाची परवानगी दिली. जर पूर्ण वेळ रुग्णालयात उपस्थिती आवश्यकता असेल तर तिथे राहण्याची मुभा ही दिली. मात्र महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी याबाबत नियमानुसार निर्णय घ्यावा, असेही म्हटले आहे. त्याचबरोबर न्यायालयात सुनावणीला हजर राहण्याची सक्ती खंडपीठाने केली असून साक्षीदारांना प्रभावित करु नये अशी ताकीद दिली आहे. आरोपींना शिक्षणासाठी स्थलांतर करता येणार नाही असे मेडिकल कौन्सिलकडून सांगण्यात आले होते. 

पायलनं गेल्या वर्षी 22 मे रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती.
--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Payal Tadvi suicide case SC allows three accused finish PG course

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT