tap Sakal
मुंबई

खारघरमध्ये पाणी टंचाई; नागरिकांची पाण्यासाठी वळवण

खारघरला ७२ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे, मात्र केवळ ६० एमएलडी पाणी उपलब्ध होते.

सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत. खारघरची लोकसंख्या चार लाखांहून अधिक असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिडकोकडून अपुरा पाणीपुरवठा (Water Supply) होत असल्यामुळे टँकरने पाणी घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. खारघर शहराला ७२ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे, मात्र केवळ ६० एमएलडी पाणी उपलब्ध होते. त्यात तळोजा एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे काही वेळ खारघरमधून तळोजा वसाहतीत पाणीपुरवठा केला जातो. त्‍यामुळे पाण्याची दैनंदिन गरज भागविण्यासाठी नागरिकांना रोजच कसरत करावी लागते. ( Water Supply Issue In Kharghar )

जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती सिडकोकडून (CIDCO) नागरिकांना दिली जात नाही. पाण्यासाठी टँकरची मागणी (Water Tanker) करूनही तो वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. सिडको वसाहतीत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या हेटवणे धरणाच्या (Hetavane Dam) मुख्य जलवाहिनीचे काम सुरू असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून दोन वर्षांपासून सांगण्यात येत आहे. दरम्यान, जलवाहिनीचे काम झाल्यास गळती थांबेल व मुबलक पाणी मिळेल, असे आश्‍वासनही देण्यात आले होते. मात्र अद्याप तरी खारघर, तळोजावासीयांचा पाणीप्रश्‍न सुटलेला नाही, तर दिवसेंदिवस तो गंभीर होत आहे.

दररोज नागरिकांच्या रोषाचा सामना

सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, हेटवणे धरणातून जेवढे पाणी प्राप्त होते, तेवढे वितरित केले जात असल्‍याचे सांगण्यात आले. दररोज नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा सिडकोने सर्व सुविधांसह खारघर वसाहत पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करावी, सुटका करावी, असेही काही कर्मचारी खासगीत बोलत आहेत. गेल्या काही दिवसांपासून खारघरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोकडून दिवसाआड टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र पुरेसे पाणी मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT