मुंबई : यंदा कोरोनामुळे सर्वच सणांवर गदा आलीये. दरवर्षीप्रमाणे यंदा एकही उत्सव साजरा झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून कोकणात प्रवास करत असतात. गणपतीत कोकणात जाता यावं म्हणून चाकरमानी अनेक महिने आधीच ट्रेन्स किंवा बसेसचं बुकिंग करतात. मात्र यावेळेस कोरोनामुळे ट्रेन्स आणि बसेस बुकिंगचे पर्याय खुले नव्हेत. अगदी शेवटपर्यंत आपल्याला कोकणात जाता येणार की नाही याचीही चाकरमान्यांना शाश्वती नव्हती. त्यामुळे यंदा अनेकांनी स्वतःची सोय करत कोकण गाठलं. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या बसेस आणि ट्रेन्स रिकाम्या गेल्यात. मात्र आता परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांनी बसेस आणि ट्रेन्सने येणं पसंत केलंय.
अनेकांना गणपतीसाठी कोकणात पूर्ण अकरा दिवस राहणं शक्य नसतं. अशात अनेक चाकरमानी एखाद दोन दिवसांनी म्हणजेच दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन उरकून पुन्हा मुंबईकडे येतात. याच धर्तीवर कालच्या दीड दिवसांच्या विसर्जनानंतर आज अनेकांचा परतीचा प्रवास सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी खासगी वाहनं किंवा बसेसऐवजी रेल्वे आणि एसटी गाडयांना पसंती दिली आहे.
आता ५ दिवसांच्या गणपतींचं विसर्जन, गौरी आणि गणपतींच्या विसर्जनानंतर म्हणजे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
people who traveled from mumbi to konkan for ganesh utsav preferes st and trains for return journey
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.