person pretend nephew of MLA Raju Patil did fraud with 50 people police investigation dombivli Sakal
मुंबई

Dombivli Crime : मला ओळखले का? मी आमदार राजू पाटील यांचा भाचा... भामट्याने तब्बल 50हून अधिक जणांना घातला गंडा

मला ओळखलं का ? मी आमदार राजू पाटील यांचा भाचा...आपण एका बैठकीत भेटलो होतो ? असे म्हणत आपल्या बोलण्यात वृद्धांना गुंतवून त्यांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला विष्णूनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - मला ओळखलं का ? मी आमदार राजू पाटील यांचा भाचा...आपण एका बैठकीत भेटलो होतो ? असे म्हणत आपल्या बोलण्यात वृद्धांना गुंतवून त्यांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला विष्णूनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली आहे.

50 हून अधिक जणांना या भामट्याने असे लुबाडले असून अटक होण्याच्या दोन तास आधी देखील दोघांची फसवणूक केल्याची कबुली त्याने दिली आहे. विजय दत्ताराम तांंबे (वय 55) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव असून तो भिवंडी येथील राहणारा आहे.

डोंबिवली पश्चिमेतील सेवानिवृत्त गणेश कुबल यांना बोलण्यात गुंतवून या भामट्याने गेल्या महिन्यात फसवलं होत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुबल यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

कुबल यांच्या तक्रारी नुसार मागील महिन्यात ते महात्मा फुले रस्त्यावरील बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढल्यानंतर गुप्ते रस्त्यावर खरेदीसाठी ते गेले आणि गोपी माॅल भागातील रस्त्याने पायी घरी चालले होते.

तेवढ्यात त्यांना एका इसमाने हाक मारून थांबवले आणि त्या अनोळखी इसमाने मला ओळखले का? मी आमदार राजू पाटील यांचा भाचा आहॆ. आपण एका बैठकीत भेटलो होतो असे बोलून कुबल यांच्याशी बोलण्याची संधी साधली.

आपण तुम्हाला ओळखूनही तुम्ही मला ओळखत नाहीत याचे आश्चर्य वाटते, असे बोलून कुबल यांचा विश्वास इसमाने संपादन केला आणि बोलण्याच्या गडबडीत इसमाने कुबल यांना भुरळ घालून त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये रोख, गळ्यातील सोनसाखळी असा ऐवज काढून घेत पसार झाला.

आपण फसलो आहॆ, हे माहिती होताच कुबल यांनी विष्णूनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याचे सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला होता.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपासाच्या आधारे मंगळवारी विष्णूनगर पोलिसांनी भामटा विजय याला नवी मुंबई येथून सापळा रचून अटक केली. त्याने 50 गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे.

भामटा विजय तांबे याला असाध्य आजार आहे. त्या आजाराचे त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. न्यायालयात तो ते प्रमाण पत्र दाखवून सहानुभूती मिळवितो. त्याला न्यायालयाकडून जामीन मिळताे.

जामीनावर सुटून आला की पुन्हा लोकांना गंडा घालण्याचे काम करतो. यावेळी पोलिस त्याला न्यायालयात हजर करताना सर्व परिस्थिती कथन करणार आहे, जेणेकरुन त्याला पुन्हा जामीन मिळू नये अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना त्याने गंडा घातला आहे. ज्या वेळी पोलिसांनी त्याला नवी मुंबईतील खारघर येथे अटक केली, त्यावेळी दोन तास आधी त्याने दोन वयोवृद्धांना लूटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT