ऐकायला जरा त्रासदायक वाटेल, पण हे अगदी खरंय. प्रेमाचं प्रतिक मानले जाणारे हेच कबुतर आता माणसाच्या जिवावर ऊठू लागलेत. कबुतरांमुळे तुम्हाला हार्ट ऍटॅक येऊ शकतो..श्वसनाच्या विकारांसह अनेक जिवघेणे आजार होऊ शकतात. मुंबईत राज्यातल्या अनेक शहरांमध्ये चौका चौकात कबुतरखाने आहे. लोकं इथं आवडीनं कबुतरांना दाणे टाकतात. पण याच कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतीय.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कबुतराची विष्ठा मानवी आरोग्यासाठी अतिशय हानीकारक आहे. विष्ठा सुकल्यानंतर त्यातील सुक्ष्म कण हवेत मिसळतात. त्यामुळे श्वसनमार्गाला सूज येऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. रूग्णाला हार्ट ऍटॅक येऊ शकतो. निमोनिया सारखा आजार होऊ रूग्ण दगावू शकतो
कबुतरांच्या विष्ठेमुळे दिल्लीत एका महिलेला जीव गमवावा लागलाय. तर 300 पेक्षा जास्त रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. त्यामुळे तुम्ही कबुतरप्रेमी असाल तर सावध रहा. पक्षी आणि प्राण्यांवर प्रेम करणं गैर नाही. मात्र तुमचं अतिप्रेम जिवघेणंही ठरू शकतं. कबुतरखान्यातल्या कबुतरांची विष्ठा अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकते.
WebTitle : pigeon are responsible for spreading heart and health issues
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.