मुंबई

नाहीतर, एकाच प्याला पडेल महागात..

प्रशांत कांबळे

मुंबई :  मित्रांसोबत बसून, बारमध्ये, घरी, गच्चीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही मद्य पित असल्यास खबरदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाची नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने सुरू असलेल्या भरारी पथकाची आपल्यावर कारवाई होऊ शकते. मात्र, या कारवाई पासून वाचायचे असल्यास, फक्त पाच रूपयात एक दिवसाचा मद्य परवाना घेऊनच मद्य पिण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. 

नाताळ, नववर्ष किंवा कोणतीही पार्टी म्हटली की, मद्याचा प्याला असतोच, मात्र मद्य पितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियम न पाळल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तिन प्रकारचे मद्य परवाने मद्यपींसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये आजीवन मद्यपिण्यासाठीचा परवाना, एक वर्षाचा परवाना आणि एक दिवसाचा मद्य परवाना मद्य पिण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आज मिळतो. त्याचप्रमाणे 1 हजार, 100 रूपये आणि पाच रूपये आणि देशी मद्य पिण्यासाठी दोन रूपये असे या परवान्याचे दर सुद्धा अल्प आहे. 

मद्य परवाना 
मद्य पिण्याचा परवाना घेतांना, बियर प्यायचे असेल तर 21 वर्षाचे वय अनिवार्य आहे. तर इतर मद्य पिण्याच्या परवान्यासाठी 25 वर्ष अनिवार्य आहे. 

परवान्याचे फायदे 
मद्य विकत घेतांना, त्याला वाहून नेतांना, किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्य पितांना, कुठेही राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड पडल्यास, परवाना असल्यास कारवाई टळणार आहे.  

उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यानुसार मद्य पिण्यासाठी सुद्धा परवाना लागतो. मात्र त्याची मद्यपींमध्ये कोणत्याही प्रकारची जनजागृती नाही. त्यातही शासनाच्या मद्य खरेदीच्या शासन मान्य दुकानामधूनच मद्य खरेदी करण्यासाठी सुद्धा हा परवाना लागत असल्याने, परवाना काढणे आवश्‍यक आहे. मात्र, सर्वाधिक प्रमाण परवाना न घेता मद्य पिणाऱ्यांचे असल्याने, नाताळ आणि नववर्षाच्या निमीत्ताने अशा मद्यपींवर कारवाई होणार आहे. 

मात्र, कारवाई टाळायची असल्यास, मद्य पिणाऱ्यांनी पार्टीच्या दिवशी एक दिवसाचा मद्य पिण्याचा परवाना काढूनच मद्य प्यावे, त्यासह मद्य खरेदी करतांना, शासन मान्य मद्य विक्रीच्या दुकानातूनच मद्य खरेदी करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लंवगरे वर्मा यांनी केले आहे. 

WebTitle : planning for new year party you better get liquor licence first

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT