Latest Thane News: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामाच्या विकास कामाचे उदघाटन आज शनिवार ता 05 रोजी ठाण्यात होणार आहे. पंतप्रधानांच्या ठाणे येथील आगमनामुळे पश्चिम महामार्गावरून ठाणे कडे जाणारी वाहन वळवण्यात आली आहे.
घोडबंदर वर्षोवा ब्रिज पासून ठाण्याकडे जाणारे वाहन थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात आणि मुंबई या दोन्ही मार्गावर मागच्या चार ते पाच तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, अनेक वाहन हे वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर वाहनधारकांनी आवश्यक असेल तरच आपण वाहन घेऊन घराबाहेर पडावे असे अहवान ही वाहतूक पोलिसाकडून करण्यात आले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर वर्षोवा ब्रिज पासून ठाणे कडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे अवजड वाहन ही महामार्गावर थांबली आहेत. त्यामुळे गुजरात आणि मुंबई या दोन्ही लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिका, हॉस्पिटल मध्ये जाणारे रुग्ण, शाळकरी मुलं यांच्यासह वाहनधारकांना मोठा बसला आहे. घोडबंदर वर्सोवा ब्रिज पासून वसई विरार पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनचालकांनी शक्यतो इच्छितस्थळी पोहचण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करण्याच आवहान वाहतुक पोलिसांनी केलं आहे.
आज पंतप्रधान ठाण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतूक वळविली आहे, मात्र ही वाहतूक वळविताना वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन लावणे गरजेचे होते. ते झाले नसल्याने आज सकाळी सहा वाजल्या पासून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
याला जबाबदार कोण, आणि आता कुणाकडे तक्रार करावी, आणि तक्रार केली तर कारवाही होणार का? असा संतप्त प्रश्न वसई च्या स्थानिक भूमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी विचारला आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.