sanjay dhumal 
मुंबई

पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

श्रीकांत खाडे

अंबरनाथ : अंबरनाथ पोलिस स्थानकात कार्यरत असेलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

धुमाळ 1993 सालातील पीएसआय बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. धुमाळ यांनी सप्टेंबर 2019 मध्ये अंबरनाथ पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. अंबरनाथला येण्यापूर्वी धुमाळ यांनी ठाण्यात नौपाडा येथे गुन्हे निरीक्षक आणि वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले होते. शिस्तबद्ध तसेच प्रेमळ पण गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी संजय धुमाळ यांची पोलिस खात्यात वेगळी ओळख आहे. 29 वर्षाच्या पोलिस खात्यात निष्ठतेने सेवा बजावली आहे. नौपाडा येथे लागलेल्या एका आगीच्या दुर्घटनेतून संजय धुमाळ यांनी 19 जणांचे प्राण वाचवले होते. याखेरीज विविध चोरीच्या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.

अंबरनाथमध्ये सहा महिन्यांच्या कारकिर्दीत संजय धुमाळ यांनी 32 रिवार्ड प्राप्त केले आहेत. त्यांच्या या धडक कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. धुमाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच अंबरनाथ शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

(संपादन : वैभव गाटे)

Police Inspector Sanjay Dhumal was recently awarded the Presidents Award

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT