मुंबई

Mumbai : आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले पोलीस दलात कार्यरत असलेल्या जुळ्या फोटोग्राफर भावांची कहाणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी व वन्य जीवनातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर त्यांना फोटोग्राफीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

योगेंद्र साटम आणि योगेश साटम जुळे भाऊ असून ते मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या छंदामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मरोळ येथे पोलीस वसाहतीत साटम बंधू वास्तव्यास आहे.

बालवयात वन्य जीवनाचे आकर्षण

योगेंद्र आणि योगेश साटम यांचा जन्म मुंबईचा. मरोळ येथील पोलीस वसाहतीत त्यांचे बालपण गेले. पवई येथे साटम बंधू शाळेत शिकायला होते. लहानपणी त्या काळात मरोळ येथून वसाहतीतून पवईच्या शाळेत जाणारा रस्ता हा जंगलातून जात असे.

त्यामुळे वन्य जीवन आणि जंगल याबद्दल विशेष आकर्षण या भांवामध्ये लहानपणीच निर्माण झाले. योगेंद्र आणि योगेश साटम या दोन जुळ्या भावांना लहानपणापासूनच फोटोग्राफीचा छंद होता तसेच मुंबईत वास्तव्यात असल्यामुळे आरे जंगलात ते नेहमी भ्रमंती करत असत. मुंबईतील जंगल त्यांनी लहानपणापासून जवळून पाहिले आहे.

फोटोग्राफीसाठी पुरस्कार

साटम बंधू यांनी मुंबईतील आरे च्या जंगलात अनेक रोमहर्षक छायाचित्रे आपल्या कॅमेरात टिपलेली आहेत अगदी बिबट्यापासून घुबडांपर्यंत विविध सृष्टीतील प्राण्यांची छायाचित्रे त्यांनी खास मोशन कॅमेरा द्वारे टिपलेली आहे. त्यांनी काढलेल्या बिबट्याच्या फोटोला 2022 साली फोटोग्राफीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

पोलीस दलात कार्यरत असणे साटम बंधूसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु कामातील तणावानंतर हे दोघे बंधू जंगलात आपलं मन रमवतात. आधीच्या जंगलात फोटोग्राफी करताना त्यांना अनेक तरुण फोटोग्राफर भेटले त्यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि त्यांचा एक ग्रुप बनला आणि आता हा ग्रुप मिळून वाईल्ड फोटोग्राफी तेथे करतो

सर्पमित्र

साटम बंधू हे केवळ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर नसून तर सर्पमित्र सुद्धा आहेत ते सांगतात लहानपणापासून बरेच वेळा जंगलाच्या रस्त्याने शाळेत जाताना त्यांना साप दिसायचे. तेव्हा सापांच्या वर्तनाचा ते बारीक निरीक्षण करायचे कालांतराने त्यांच्या मित्राने त्यांना सापा संदर्भात एक पुस्तक दिलं होतं त्याचं त्यांनी बारकाईने अध्ययन केले. आता ते आरे जंगलाच्या लगत मानवी वस्तीत सर्पमित्र म्हणून काम करतात

दुर्मिळ प्रजातींचे संशोधन

योगेंद्र साटम हे आरे मध्ये सापडणाऱ्या दुर्मिळ कोळी च्या प्रजातीवर संशोधन करत आहे. त्यांच्या मते आरे कॉलनीत अतिशय दुर्मिळ प्रजातीचे कोळी पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर येथील दुर्मिळ पालींचा देखील ते संशोधन करत आहे तसेच त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी चार ते पाच वेगवेगळ्या विंचूंच्या प्रजाती येथे योगेंद्रना त्यांच्या निरीक्षणात मिळालेल्या आहेत

बिबटया विषयी जनजागृती

आरे कॉलनी जंगलाच्या लगत राहणाऱ्या मानवी वस्त्यांमध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळतात या पार्श्वभूमीवर साटम बंधू बिबट्यांचा मानवाशी संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. येथील राहणाऱ्या मानवी वस्तीमध्ये बिबट्या संदर्भात परिस्थिती हाताळण्यासाठी जनजागृती मोहीम करतात.

त्यांच्या मते आरे कॉलनी बिबट्यांची संख्या आता सदैव आणि वाढलेली आहे परंतु जंगलाचे क्षेत्र हे अपुरा आहे परिणामी जर हा संघर्ष टाळायचा असेल तर जंगल क्षेत्र वाचवणं गरजेचं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

Diwali 2024: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी अन् भगवान गणेशाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या? वाचा सविस्तर

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

SCROLL FOR NEXT