Akshay Shinde Encounter ESakal
मुंबई

गाडी मुंब्रा बायपासवर आली, तेव्हाच अक्षयने बंदूक खेचली अन्... अखेर पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!

Vrushal Karmarkar

बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या समोर आला आहे. बदलापूर शाळेच्या घटनेशिवाय अन्य दोन गुन्ह्यांमध्ये त्याला ट्रान्झिट रिमांडवर घेण्यासाठी पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. पोलिसांच्या संरक्षणात आरोपींनी रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी प्रेसनोट जारी करत घटनेची माहिती दिली आहे.

पोलीस नेमकं काय म्हणाले?

पोक्सो अॅक्ट या गुन्ह्यात अटक आणि सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी असलेला आरोपी नामे अक्षय अण्णा शिंदे (२४) यास बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र.नं 409/2024 377,324,323,504 भा.द.वि या गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पथक हे तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ट्रान्सफर वॉरंट सह गेले होते. प्राथमिक माहिती नुसार सायंकाळी सुमारे 05.30 वा. सदर आरोपी यास नमूद पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले.

त्यास घेऊन ठाणे येथे येत असताना, सुमारे 06.00 वा. ते 6.15 वा. चे दरम्यान पोलीस व मुंब्रा बायपास येथे आले असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि / निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 01 राऊंड सपोनि / निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 02 राऊंड इतरत्र फायर झाले. स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास लागून तो जखमी झाला.

पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस सपोनि / निलेश मोरे व आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास उपचारकामी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय, कळवा येथे आणले असता, डॉक्टरांनी तपासून सपोनि / निलेश मोरे व इतर पोलीस यांना पुढील उपचारकामी ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे रेफर केले असून, आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास तपासून मयत घोषित केले आहे. सदर मृत आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नियमानुसार सर जे जे हॉस्पीटल, मुंबई येथे करण्याची तजवीज ठेवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अक्षयला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला हवी होती; गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया

आरोपी Akshay Shinde याच्या मृत्यूमागे रश्मी शुल्कांचा हात, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वेळी नक्की काय घडलं? पोलिसांवर का व्यक्त केला जातोय संशय? वाचा इनसाईड स्टोरी

Akshay Shinde: एन्काऊंटर पूर्वी अक्षय शिंदे आपल्या आईशी शेवटचं काय बोलला?

SCROLL FOR NEXT