Thane News 
मुंबई

Thane News : "ठाणे जिल्ह्यात असं काय घडलंय की १०० लोकांना दिले पोलीस संरक्षण"

Sandip Kapde

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धक्कादायक विषय समोर आणला आहे. ठाणे जिल्ह्यात १०० लोकांना पोलीस संरक्षण दिल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. मात्र माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे.

शेखर बागडेच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीमार्फत चौकशी करावी...

ठाणे जिल्हयात वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे याने बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्याची एसीबीमार्फत चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहे असे सांगतानाच शेखर बागडे यांच्या मालमत्तेची आकडेवारीच त्यांनी माध्यमांसमोर ठेवली.

बूँद से गई वो हौद से नहीं आती -

अजित पवार म्हणाले, मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत सरकारने दुरुस्ती केली परंतु आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न  करण्यात आला आहे का? असा सवाल जनतेच्या मनात आहे. आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरातीत नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे. त्यात वरील भागात भाजप-शिवसेनेचा उल्लेख केला तर मग भाजपचे मंत्री का नाहीत?

ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे त्यातील पाच मंत्र्यांच्या विरोधात काही ना काही  बातम्या माध्यमातून सुरू आहेत. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न या नऊ लोकांचे फोटो छापून केला आहे का? याचे उत्तरही सरकारने दिले पाहिजे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चा घोळ कायम; तुर्त ‘८५’ च्या फॉर्म्युल्यावर एकमत; अन्य ३३ जागांवर चर्चा

Priyanka Gandhi : वायनाड हे माझ्यासाठी कुटुंबच; काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Assembly Elections 2024: नेत्यांनो, शिव्यांचा वापर करू नका!

SCROLL FOR NEXT