मुंबई

शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदींना शिवराय समजू लागले; सचिन सावंतांची टीका

तुषार सोनवणे

मुंबई - भाजपने अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे,. महाराजांचे नाव फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरणाऱ्या भाजपला महाराजांची कन्या आणि पत्नी यांच्यातील फरकही समजला नाही. सकवारबाई महाराजांच्या कन्या होत्या तसेच त्यांच्या एका पत्नीचे नावही सकवारबाई होते. परंतु भाजपच्या विकृत लोकांनी महाराजांची कन्या आणि महाराजांची पत्नी यांचे नाव वेगळे असल्याचे सांगून बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला. अशी घणाघाती टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.  

शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांची जातीभेदविरोधी भूमिका ट्विटरच्या माध्यमांतून मांडत असताना, महाराजांच्या कन्या सकवारबाई यांच्या जीवनातील एक उदाहरण दिले. त्यात वाल्हे गावातील महार समाजातील लोकांना सकवारबाई यांनी भोसले हे नाव दिले होते.

या ट्विटवर भाजपने आपली विकृत बुद्धी दाखवत सकराबाई हे महाराजांच्या पत्नीचे नाव असल्याचे म्हटले. तसेच भाजपच्या बड्या नेत्यांनीही ते ट्विट रिट्विट केले.

मी त्यांचा हा दावा ऐतिहासिक पुराव्यानिशी खोडून काढला. प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंके यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक’ या पुस्तकात महाराजांची कन्या सकवारबाई व पत्नी सकवारबाई यांचा उल्लेख करण्यात आलेला असून त्यामध्ये शिवापूरयादी तसेच तंजावरच्या शिलालेखात महाराजांची कन्या सकवारबाईंच्या जन्माचा उल्लेख आहे, असे म्हणत यासंदर्भात प्रख्यात इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या शिवाजी: हिज लाइफ अँड टाइम्स या पुस्तकाचा दाखला दिला आहे. असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदींना शिवराय समजू लागले यापेक्षा अधिक पातक ते काय? भाजप शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या व त्यांचा इतिहास संपवणाऱ्या व्यक्तिंना आदर्श माननारा पक्ष आहे. अशी सडकून टीका सावंत यांनी आज केली.

-----------------------------------------------------

political marathi news Criticism of Sachin Sawant on shivaji maharaj history politics updates live

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT