मुंबई

हायकमांडकडून आला फोन, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची अधिकृत निवड

सुमित बागुल

मुंबई : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीत मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा अध्यक्ष असलेले नाना पटोले यांनी काल आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा अधिकृत राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. यानंतर नाना पटोले यांची काँगेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असं बोललं जात होतं. दरम्यान, आज काँग्रेसकडून अधिकृतरीत्या नाना पटोले यांना फोन आलेला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची अधिकृतरीत्या वर्णी लागली आहे. 

दरम्यान, काँग्रेसकडून याबाबतचे अधिकृत पत्र देखील काढण्यात आले आहे.

कसा राहिला नाना पटोले यांचा राजकीय प्रवास : 

  • नाना पटोले यांचा जन्म शेतकरी कुटुंबात ५ जून १९६३ मध्ये झाला. 
  • आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता पटोले यांची ओळख 
  • नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष ते आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद असा राजकीय प्रवास राहिलाय 
  • आपल्या राजकीय कारकिर्दीत नाना पटोले यांनी आमदार, खासदार, विधानसभा अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत
  • विद्यार्थी संघटनेत काम करताना १९९० मध्ये सानगडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढविली. यात ते विजयी झाले. 
  • यानंतर त्यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. 
  • १९९९ व २००४ मध्ये काँग्रेसने लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली, यात त्यांनी विजय  मिळविला.
  • नाना पटोले यांनी शेतकर्यांच्या मुद्दावर तत्कालीन काँग्रेस पक्ष गंभीर नसल्याचे कारण समोर करून २००८ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
  • दरम्यानच्या काळात ओबीसी छावा संघटनेच्या माध्यमातून २००९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा लढविली, ज्यात त्याचा पराभव झाला. 
  • २००९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपकडून विजयी झाले. 
  • २०१४ मध्ये त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी दिली. 
  • राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी सुमारे दीड लाख मताधिक्याने पराभव केला होता.
  • २०१७ ला नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर  टीका करत भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती 
  • त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेमध्ये घरवापसी केली. भारतीय जनता पक्षातूनआल्याने त्यांच्या नावाला मोठा विरोध देखील केला जात होता. 
  •  २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढविली, ज्यात नाना यांचा पराभव झाला होता. 

दरम्यान प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारलं असता, "काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष कसा करता येईल हेच माझ्यासमोर उद्दिष्ट असेल असं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं".

आता काँग्रेच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ नाना पटोले यांच्या गळ्यात पडल्याने येत्या काळात काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात कशी उभारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

political news congress leader nana patole elected as maharashtra congress chief

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT