मुंबई

खासदारांना शिंदे यांना सूचक इशारा देणारी बॅनरबाजी; शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गुरुवारी वाढदिवस असल्याने शहरभर शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. यातील कल्याणच्या नेतिवली चौकातील माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा बॅनर मात्र सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. खासदारांना दिलेल्या शुभेच्छांपेक्षा 'खासदार दिलदार है....लेकिन कुछ चमचो से लोक परेशान है' या छोट्या अक्षरातील त्यांच्या संदेशाने शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. खासदार दिलदार आहेत, मात्र त्यांच्या निकटवर्तीयांचा शिवसेनेतील पदाधिकारी - कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याची नाराजी या संदेशातून व्यक्त करण्यात आली आहे. शेट्टी यांनी या बॅनरबाजीतून खासदारांना शालजोडीतील सूचक इशारा दिला असल्याची चर्चा रात्रीपासून शहरात रंगली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय हालचालींना वेग आले आहेत. फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले असतानाच सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडी महिन्याभरापासून कल्याण डोंबिवलीत सुरु आहेत. त्यातच कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर सध्या महापालिका निवडणुकीची धुरा देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेत सुरु आहे. त्यातच खासदार शिंदे यांचा 4 फेब्रुवारीला वाढदिवस आल्याने त्यांना शुभेच्छा देणारे मोठमोठे बॅनर शहरात सगळीकडे झळकत आहेत. त्यातील एका बॅनरने मात्र साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. समाज माध्यमावर या बॅनरचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून मल्लेश शेट्टी यांनी खासदार शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्याखाली खासदार दिलदार है....लेकीन कुछ चमचो से लोग परेशान है...या संदेशाने मात्र साऱ्यांचेच त्याकडे लक्ष वेधले आहे. नेतिवली चौकातच मल्लेश शेट्टी यांचे कार्यालय आहे. विशेष म्हणजे या नाक्यावरुन मुंबई, नाशिक, पुणे दिशेला जाणाऱ्या वाहनांची रहदारी असते. त्यामुळे वाहनांमधून जाताना अनेक नागरिक या बॅनरचे फोटो काढून ते व्हायरल करीत होते. त्यामुळे या संदेशाची चर्चा केवळ कल्याण डोंबिवलीत नाही तर मुंबई, पुणे, नाशिकमध्येही चर्चिली गेली. 

खासदार शिंदे यांचे काम चांगले आहे. त्यांच्या कामावर सारेच खूश आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यात खासदार शिंदे यांची एक वेगळी क्रेझ आहे. अनेक सामान्यातील सामान्य नागरिकांना शिंदे यांनी मदत केली आहे. परंतू त्यांच्यापर्यंत लोकल स्तरातील समस्या घेऊन जाण्यात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात त्यांच्याजवळील काही निकटवर्तीय आडकाठी आणतात. ही खदखद गेल्या काही वर्षापासून स्थानिक शिवसैनिकांमध्ये आहे. तीच खदखद या बॅनरमधून प्रकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

polititics marathi latest banner waving warning MPs to shrikant Shinde kalyan city political marathi news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soneri Bhog Sweet: 24 कॅरेट सोन्याचा वापर; महाराष्ट्रात 'सोनेरी भोग' मिठाई आकर्षणाचे केंद्र, किंमत ऐकून व्हाल थक्क

Pakistan Cricket: पाकिस्तानने नवा ODI-T20I कॅप्टन केला जाहीर; 'हा' खेळाडू घेणार बाबर आझमची जागा

Pranav Pandey: क्रिकेटरच्या पप्पांचा JDU मध्ये प्रवेश; वडिलांचे नाव प्रणव पांडे, पण इशान आडनाव 'किशन' असं का लिहितो?

त्या फॅनने केक भरवताच...श्रद्धाच्या कृतीने नेटकरी भारावले ; व्हिडीओ झाला व्हायरल

Jaishankar on Terror Attack : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिलं नाही, पण...; एस जयशंकर यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT