मुंबई : पूजा चव्हाण अपमृत्यू प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली असल्याचे समजते. काल सायंकाळी सात वाजता राठोड यांना वर्षावर बोलावून घेण्यात आले होते. तरुणीच्या मृत्यूप्रकरणाभोवती उभे झालेले वादळ तसेच कडक लॉकडाऊनच्या काळात पोहरादेवी मंदिरात केलेली गर्दी लक्षात घेता आता पायउतार व्हा असे सांगण्यात येणार असल्याची माहितीय समोर येतेय.
महत्त्वाची बातमी : चार वर्षाच्या मुलाला सावत्र पित्याकडून इस्त्रीचे चटके; आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
मंत्रिमंडळातील सहकारी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, अनिल परब तसेच शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, खासदार विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशी गेले दोन दिवस यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संपर्क ठेवून होते. हा निर्णय घेतला तर शिवसेनेला आपल्याच मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची गरज वाटते पण सहकारी मंत्र्यांची नाही, असे चित्र निर्माण होईल. ही बड्या मंत्र्यांकरवी भूमिका मांडली गेली होती. मात्र भाजपने पेटवलेले वातावरण आणि जनक्षोभ लक्षात घेता राजीनामा घेणे अपरिहार्य आहे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली असल्याचं समजतंय.
महत्त्वाची बातमी : मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत 'मोठी' बैठक
"चुकले 'हे' मान्य पण आपल्या मंत्र्यानेच त्याग का करावा ?"
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इशाऱ्यावरून घेणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले असल्याने त्यांनीही दोन पावले मागे यावे अशी भूमिका सेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी घेतली असल्याचे समजते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीत यासंबंधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेताना सर्व बाजुंचा विचार करावा असे सेना नेत्यांनी सुचवले आहे.
pooja chavan death case cm may ask minister sanjay rathod to resign any time
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.