वंदे भारत रेल्वे sakal media
मुंबई

Vande Bharat Train Food: वंदे भारत ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; प्रवाशांच्या वाढल्या तक्रारी!  

सकाळ डिजिटल टीम

Vande Bharat Train Food: मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) या ट्रेनमध्ये जेवण पुरवले जात आहे. ‘आयआरसीटीसी’ आपल्या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे पथक मुख्य किचनमध्ये पाठवून तपासणी करणार आहे, अशी माहिती वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.


वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने सीएसएमटी ते साईनगर शिर्डी या मार्गावर १० फेब्रुवारी २०२३ ला ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही ट्रेन सुरू करण्यात आली. या सेमी हायस्पीड ट्रेनला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या गाडीत देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

गेल्या आठवड्यापासून सीएसएमटी-साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ ट्रेनसह इतर मार्गावरील ट्रेनमध्येही निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. रेल्वे देत असलेले जेवण महाग असते. मात्र, जास्त पैसे मोजूनही खाद्यपदार्थांचा दर्जा निकृष्‍ट असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

चार दिवस करणार देखरेख
प्रवाशांच्या जेवणाच्या दर्जाविषयी तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आयआरसीटीसीचे पथक मुख्य किचनमध्ये चार दिवस ठाण मांडून जेवण बनवताना देखरेख ठेवणार आहे. काही चुकीचे दिसल्यास स्वयंपाकी आणि किचनमधील कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

पेंट्री कार सुरू करा!
‘वंदे भारत’ ट्रेनला दिवसेंदिवस चांगली पसंती मिळत आहे. मात्र, गाडीत मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्‍ट असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जेवणाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी या ट्रेनमध्ये पेंट्री कार सुरू करावी. पूर्वी राजधानी एक्स्प्रेससारख्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांत पेंट्री कार असल्यामुळे प्रवाशांना दर्जेदार, चविष्‍ट तसेच गरमागरम जेवण मिळत होते. मात्र, आता पेंट्री कार बंद केल्याने जेवणाचा दर्जा घसरला आहे, असे ‘रेल यात्री परिषदे’चे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली.

‘वंदे भारत’ ट्रेनमधील जेवणाच्या दर्जासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारींची दखल आम्ही घेतली आहे. अधिकाऱ्यांचे एक पथक आम्ही ‘आयआरसीटीसी’च्या किचनमध्ये पाठविणार आहोत.
- राहुल हिमालया, समूह महाव्यवस्थापक, पश्चिम झोन, आयआरसीटीसी

नाशिक रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये रविवारी निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले होते. जेवणात आलेली चपाती जाड आणि कडक होती. दही खूपच आंबट होते. याशिवाय जेवणाच्या डिशमध्ये लाकडी चमचा दिला जात असल्याने प्रवाशांनी भात कसा खायचा? रेल्वेने याकडे लक्ष देऊन जेवणाचा दर्जा सुधारावा.
- कमलाकर शेनोय, प्रवासी

‘वंदे भारत’ ट्रेनमधून शुक्रवारी वडोदरा ते मुंबई असा प्रवास केला. मात्र, या ट्रेनमध्ये जेवणाच्या गुणवत्तेबाबत निराश झाली होती. स्नॅक्स आणि रात्रीच्या जेवणाला चव नव्हती. त्यामुळे जेवणाचा दर्जा सुधारण्यात यावा.
- प्रियंका तिवारी, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT