मुंबई

कोरोना पॉझिटिव्ह मातेने दिला निगेटिव्ह बाळाला जन्म, स्तनपानाबद्दल WHO म्हणतंय..

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. अशातच एका कोरोना पॉझिटिव्ह मातेने एका निगेटिव्ह बाळाला जन्म दिला आहे. या मातेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दक्षिण मुंबईतील 35 वर्षीय कोव्हिड - 19 पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलेने रविवारी नानावटी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात निरोगी मुलीला जन्म दिला. या महिलेच्या गर्भाला 38 आठवडे पूर्ण झाले होते. तिला दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रोटोकॉलनुसार, तिला कोणतीही लक्षणे नसताना तिची कोव्हिडची चाचणी करण्यात आली. पण, 18 एप्रिलरोजी तिची तपासणी पॉझिटिव्ह आली. ज्या रुग्णालयात तिला घेऊन गेले होते तिथे कोव्हिड रुग्णांच्या प्रसूतीसाठी कोणतेही युनिट नसल्याने महिलेला नानावटी रुग्णालयात पाठवण्यात आले. 

गर्भवती महिला कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याकारणाने संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, नानावटी रुग्णालयाने ही महिला दाखल होण्याआधीच सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. कोव्हिड - 19 संसर्गजन्य रोगतज्ज्ञ आणि बालरोग विभाग यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय केस स्टडीज, प्रसूतीशास्त्र, स्त्री रोग विभागाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वांनुसार या महिलेसाठी एक डिटेल्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात आली. 

भारतात अशा प्रकारच्या मोजक्याच शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यात संसर्ग कंट्रोल प्रोटोकॉलनुसार, विशेष प्रसूतीगृहे तयार केली गेली. आम्ही कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवली आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले आहे. मातेला त्रास होऊ नये म्हणून कोव्हिड कॉरिडोर तयार करण्यात आला होता अशी माहिती नानावटी रुग्णालयाच्या प्रसूतिशास्त्र आणि स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सुरुची देसाई यांनी दिली आहे.

मातेच्या प्रसुतीनंतर बाळाला विशेष आयसोलेशन इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवले आहे. तिसऱ्या आणि आठव्या दिवशी बाळाचे कोव्हिड 19 तपासणी केली जाईल. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे निरोगी आहे. 

कोव्हिड माता स्तनपान करु शकते - 

जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार, कोव्हिड 19 झालेली महिला बाळाला स्तनपान करु शकते. मात्र, यावेळी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क लावूनच बाळाला हाताळलं पाहिजे. बाळाला स्पर्श केल्यानंतर किंवा करण्याआधी हात धुतले पाहिजे. तसेच, रुग्णाने स्पर्श केलेले पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंंतुक केले पाहिजे. तरंच, माता बाळाला स्तनपान करु शकेल.

positive pregnant mother gave birth to negative baby in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT