Posters of Maharashtra CM Eknath Shinde put up near the venue of the INDIA alliance meeting, in Mumbai.  
मुंबई

INDIA Alliance Meeting : मुंबईत पेटलं पोस्टर वॉर! इंडिया आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणाबाहेर लागले CM शिंदेंचे पोस्टर

रोहित कणसे

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे. 31 ऑगस्ट म्हणजेच गुरुवारी बैठक झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील ही बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान, मुंबईत पोस्टर वॉर सुरूच असल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान शहरात विरोधी पक्षनेत्यांच्या पोस्टर्स लावण्यात आले होते. आता या पोस्टर्समध्ये आणखी काही पोस्टर्स लावण्यातआले आहेत . हा विरोधकांच्या आघाडीवर अप्रत्यक्ष हल्ला असल्याचे मानले जात आहे.

गुरुवारी देखील काही पोस्टर्सही समोर आले होते. यानंतर शुक्रवारी देखील इंडिया आघाडीच्या बैठक होत असलेल्या ठिकाणाजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला असून, 'कष्टकरी, प्रामाणिक आणि निडर' अशा आशयाचा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे.

यासोबतच शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पोस्टर देखील लावण्यात आले होते. या पोस्टरवर 'मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही' असा मजकूर लिहीण्यात आला होता. या पोस्टरवर कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाव लिहिलेले नसले तरी शिंदे गटातील शिवसेनेने हे पोस्टर लावल्याचे बोलले जात आहे. या पोस्टरच्या माध्यमातून शिंदे गटाने उद्धव गटावर निशाणा साधला आहे. ज्या ठिकाणी इंडिया आघाडीची बैठक झाली त्याच ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT