potholes on Kopar flyover connecting Dombivli East and West Traffic congestion  sakal
मुंबई

Dombivli News : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे; वाहतूक कोंडी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्याच्या घडीला खड्ड्यांनी वेढला असून यामुळे पुलावर प्रचंड प्रमाणात वाहन कोंडीची समस्या उ्द्भवत आहे. वाहनांची वर्दळ व पावसामुळे या पुलावर खड्डे पडू नये म्हणून पालिका प्रशासनाने येथे मास्टिक अस्फाल्टचा उपयोग केला आहे.

मात्र हे मास्टिक अस्फाल्ट देखील कुचकामी पडले असून पुलावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावून येथे वाहन कोंडी होत आहे. शिवाय कोपर पुलाच्या वळणावर दोन मोठी वाहने समोरा समोर आल्यास त्यांना टर्न मारण्यास अडथळा येऊन देखील वाहन कोंडी होत आहे. दोन तीन वर्षातच पुलाची ही अवस्था असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा पूल आहे. पुलाची जीर्णावस्था झाल्याने 2020 मध्ये पुलाच्या पुर्नबांधणी चे काम हाती घेण्यात आले. कोरोना काळातील अडचणींचा सामना करत अत्यंत कमी कालावधीत पुलाचे काम पूर्ण केले गेले.

यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये पुलाचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करत तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. चांगले काम करत त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी आपली पाठ थोपटून घेतली होती.

शिवाय पुलावर खड्डे पडून वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून या पुलावरील बांधकामात मास्टिक अस्फाल्टचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पुलावरील रस्त्यावर खड्डे पडणार नाही असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मुळात उद्घाटन होत नाही तोच दोन दिवसांतच पुलावर पहिला खड्डा पडला होता.

त्याविषयी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर झोड घेत त्याविषयीचे मिम्स व्हायरल केले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी देखील पालिका प्रशासनाच्या या कामाचा समाचार घेतला. सकाळने त्याविषयी वृत्त प्रसारीत करताच पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत पुलावर पडलेला पहिला खड्डा हा बुजविला होता.

पुलाचे काम होऊन दोन ते तीन वर्षाचा कालावधी उलटला आहे. तोच यंदाच्या पावसाळ्यात पुलावर एक दोन नाही तर असंख्य खड्डे पडले आहेत. पूर्व व पश्चिम दिशेला उतारावर देखील खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे पुलावरुन वाहतुक करणाऱ्या वाहनांचा वेग मंदावून पुलावर सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होत आहे.

शिवाय कोपर उड्डाणपूलावर पूर्व दिशेला असलेल्या वळणाच्या ठिकाणी दोन मोठी अवजड वाहने समोरा समोर आली तर त्यांना वळण घेण्यात मोठी अडचण येऊन त्यांच्या पाठीमागे लगेच वाहन कोंडी होते. शहरात पावसाचा जोर असल्यास या खड्डयांतून तसेच वाहन कोंडीतून मार्ग काढताना वाहनांचा वेग आपोआप कमी होऊन येथे वाहन कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

डोंबिवली पूर्व पश्चिमेला ये जा करण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपूलाचा देखील पर्याय उपलब्ध आहे. मात्र या पुलाचे ठाकुर्ली दिशेला झालेले अर्धवट काम. शहराच्या एका कोपऱ्यात असलेला पूल आणि पुल अरुंद असल्याने अवजड वाहनांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणी यामुळे या पुलावरुन मोठी वाहने फारशी वाहतूक करत नाहीत.

शहराच्या बाहेरुन येऊन डोंबिवली पश्चिमेला ये जा करणाऱ्या अवजड वाहनांना कोपर पुल हा मध्यभागी पडत असल्याने याच पुलाला वाहनचालक प्राधान्य देत आहेत. परंतु या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या पुलावरून वाहन चालवताना अनेक अडचणींचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.

या पुलावर खड्डे पडू नये म्हणून मास्टिक अस्फाल्टचा वापर केला गेला आहे. मग यंदाच्या पावसाळ्यात खड्डे कसे पडले ? असा सवाल वाहनचालक करु लागले आहेत. पालिका प्रशासन या सर्व समस्यांकडे स्वतःहून लक्ष देणार का ?

असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांविषयी एखादे वृत्त छापून आल्यानंतर किंवा त्याविषयी लोकांनी समाज माध्यमावर आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग येऊन केवळ त्याच रस्त्यांची डागडुजी केली जाते. इतर रस्त्यांकडे मात्र पाहीले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT