Prakash Ambedkar sakal
मुंबई

Prakash Ambedkar: "तुम्ही मंडल बरोबर नव्हे तर कमंडल बरोबर होता"; प्रकाश आंबेडकरांचा शेंडगे, भुजबळांवर हल्लाबोल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात सध्या आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांना एक इशारा दिला आहे. तसेच त्यांनी माझ्या लागू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. (Prakash Ambedkar You were with Kamandal not Mandal Prakash Ambedkar jibe at Prakash Shendge Chchagan Bhujbal)

ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये - आंबेडकर

आंबेडकर म्हणाले, ओबीसींच्या सध्याच्या नेत्यांनी कृपा करुन माझ्या नादी लागू नये. कारण इतिहास जर काढला तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होतात. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. कारण ओबीसींचं आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत, जनता दलाबरोबर आणि त्यापूर्वी जनता पार्टीबरोबर. आत्ता आरक्षण वाचवता येत नाही म्हणून भिडवण्याची भाषा सुरु आहे. (Latest Marathi News)

विकासाच्या योजनाच नाहीत

दुर्देवानं इथल्या शासनानं विकासाच्या योजना आखल्याच नाहीत म्हणून आपला विकास करुन घ्यायचा असेल तर आरक्षण हा एकमेव मार्ग आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. आरक्षण हा काही विकासाचा मार्ग नाही तर ते प्रतिनिधीत्व आहे.

राजे-महाराजांच्या काळात शूद्र, अतिशुद्रांना म्हणजे आत्ताचे ओबीसी आणि दलित-आदिवासी यांना अशांना त्यांच्या दरबारात चोपदार होण्याचाही अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या काळात नव्हताच. अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये तर नव्हताच त्यामुळं उद्या जी लोकशाही देशात ही लोक पुन्हा बाहेर राहू नयेत म्हणून आरक्षण आलं. (Marathi Tajya Batmya)

आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी दोघेही शिक्षण महर्षी

जे आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी आहेत हे शिक्षण महर्षी आहेत. त्यांनाही हे माहिती आहे की, आज भारतातून परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी किती जातात? २० लाख विद्यार्थी बाहेर शिकायला जातात. ४० लाख एका विद्यार्थ्यावर खर्च होत असेल तर किती निधी बाहेर जातो हे लक्षात घ्या.

सध्याचे जे शिक्षण सम्राट आणि मराठा नेते आहेत तेच इथल्या विकासाचे विरोधक आहेत. कारण आपल्या संस्था चालल्या पाहिजेत म्हणून त्यांनी नव्या संस्था येऊ दिल्या नाहीत आणि त्यांनी संकुचित शिक्षण केलं. ज्यामध्ये रोजगार निर्माण होऊ शकला असतो. करोडो रुपयांचा निधी परदेशात जातो तो थांबला असतो. देशात नव्यानं २० लाख नोकऱ्या तयार झाल्या असत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

Local Update: गोरेगाव-कांदिवली लाईनवर काम; 23 आणि 24 सप्टेंबरला 6.5 तासांचा ब्लॉक, काही गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT