निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे.
मुंबई- निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये जवळपास दीड तास चर्चा होण्याची शक्यता आहे. भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, तसेच ही भेट नेमकं कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत उत्सुकता आहे. (prashant kishor will meet ncp chief sharad pawar silver oak)
प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये आखलेल्या रणनीतीचे फायदे दिसून आले आहेत. त्यांनी मोदी आणि शहा यांचा झंझावात बंगालमध्ये रोखून दाखवला. अमित शहा यांनी बंगालमध्ये 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता, पण भाजपला म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार राहणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
यूपीएच्या नेतृत्वाबाबत सध्या चर्चा सुरु आहे. यूपीएच्या नवीन नेतृत्वाचा शोध सुरु आहे. यात शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाऊ शकतो का? याची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. यात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला टक्कर द्यायची असेल तर यूपीएची पुनर्रचना करण्याची गरज आहे. यासंबंधी या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे नेतृ्त्व करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. याला काँग्रेसने विरोध केला होता. पण, सध्या काँग्रेसकडे नेतृत्त्वाचा चेहरा नाही. त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. 2024 च्या लोकसभेच भाजपला टक्कर देणे जड जाणार आहे. काँग्रेस अजूनही कमकूवत आहे आणि राहुल गांधींनी पक्षाला पुन्हा उभारी देण्याचं कौशल्य दाखवलेलं नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवार-प्रशांत किशोर यांची भेट होत असल्याचं सांगितलं जातंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.