भाईंदर - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा भाईंदर शहरात 'वारकरी भवन' उभे राहणार आहे. यासाठी विशेष निधीसह आमदार व खासदार निधी मिळून 1 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच वारकरी भवनाचे काम मीरा भाईंदर शहरात सुरु होणार आहे. या निर्णयाचे वारकरी संप्रदायातील मीरा भाईंदरमधील सदस्यांनी स्वागत केले आहे.
हेही वाचा - कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना; पंतप्रधानांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 जवळ मन ओपस या सुविधा क्षेत्र भूखंडावर 'वारकरी भवन' इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिका महासभेतही या कामाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 'वारकरी भवन' उभारण्यासाठी आमदार सरनाईक प्रयत्नशील होते व त्यांच्या संकल्पनेतून हे काम साकारत आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून 1 कोटी रुपये विशेष आमदार निधी आमदार सरनाईक यांनी मंजूर करून आणला आहे. त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक यांचा स्वतःचा 25 लाख आमदार निधी, खासदार राजन विचारे यांचा 25 लाख खासदार निधी, आमदार रवींद्र फाटक यांचा 25 लाख आमदार निधी असे एकूण 1 कोटी 75 लाख रुपये 'वारकरी भवना'साठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आता या कामाची निविदा प्रक्रिया होणार असून जानेवारी महिन्यात 'वारकरी भवना'च्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
Pratap Saranaiks concept to build Warkari Bhavan in Mira Bhayander
-------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.