मुंबई : मनिलॉण्डरिंग प्रकरणात (Money laundering case) अटक करण्यात आलेले व्यावसायिक प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनी एका आघाडीच्या राजकीय नेत्याबरोबर आर्थिक व्यवहार (financial deal) केले आहेत आणि अनेक बड्या व्यक्तींसाठी ते अशी कामे करतात, असा खळबळजनक दावा बुधवारी विशेष न्यायालयात ईडीच्या (enforcement directorate) वतीने करण्यात आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
ईडीने राऊत यांना २ फेब्रुवारी रोजी अटक केली. बुधवारी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशीही ईडीने गेल्या वर्षी पीएमसी बैक गैरव्यवहारप्रकरणी केली होती. त्यातून प्रवीण राऊत यांच्या पत्नीशी त्यांचा संबंध असल्याचा दावा यंत्रणेने केला होता. मुंबईतील एका चाळीच्या पुनर्विकास प्रकरणात सुमारे १०३४ कोटींचा भूखंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे राऊत माजी संचालक होते. सध्या या प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे आणि राऊत या गैरव्यवहारात सक्रिय माध्यम म्हणून काम करत होते असे दिसत आहे, असा आरोप बुधवारी ईडीने केला.
अनेक प्रभावित व्यक्तींसाठी किंवा व्यक्तींबरोबर राऊत काम करतात, असा दावाही या वेळी करण्यात आला. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या उपकंपनीमार्फत चटईक्षेत्र विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट ही कंपनी पीएमसी बँक गैरव्यवहारात रडारवर आहे. राऊत यांनी काही राजकीय व्यक्तींना पैसे पुरविले आहेत, असा ईडीचा दावा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.