Samruddhi Mahamarg bus Accident sakal
मुंबई

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खाजगी बसने घेतला पेट; चालकसह 32 प्रवासी बचावले

बसमध्ये आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

मेहकर : अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या धावत्या खाजगी बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान चालकाच्या सतर्कमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून अपघातात कोणतीही जिवितहानी न झाल्याने मोठा अपघात टळला. ही मेहकर जवळच असलेल्या फरदापुर समृद्धी महामार्गावर शनिवारी 30 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12:30 च्या सुमारास घडली.

प्राप्त माहीतीनुसार, अमरावती येथून एम एच 37 टी 5454 क्रमांकाची खाजगी बस शनिवारी रात्री पुणे येथे जात होती. या बस मध्ये 32 प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान समृद्धी महामार्गावर चैनल नंबर 280 वर फरदापुर गावाजवळ बसने अचानकपणे पेट घेतली. हा प्रकार बस चालकाच्या लक्षात आल्याने तात्काळ बस चालकाने रस्त्याच्या बाजूला बस थांबून सर्व प्रवाशांना खाली उतरविले.

घटनेची माहिती मिळताच फरदापुर चौकीचे ठाणेदार उज्जैनकर, पोलीस कर्मचारी शेख नजीर यांनी तात्काळ धाव घेतली व क्यू आर व्ही पथकाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. बसमध्ये आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर बसमधील सर्व प्रवाशांना दुसरी बसमध्ये बसवून रवान करण्यात आले. बसचे चालक शेख रजाक शेख आयुब रा, दारव्हा व दुसरे चालक प्रवीण मुंडे रा, मंगरूळपीर यांच्यासह सर्व 32 प्रवासी सुखरूप आहेत. या बसमध्ये एसीच्या केबल च्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असेल असे प्राथमिक अंदाज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT