doctor 
मुंबई

 बाप रे! खासगी डॉक्टर आता 'या' गोष्टीसाठी देतायत नकार; कोरोनाच्या टेस्टसाठी संशयितांची फरफट. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना चाचणीसाठीच्या नियमावलीत गोंधळ असल्याने याचा फटका रुग्णांसह डॉक्टरांना ही बसतोय. कोविड 19 चाचणी करायची असल्यास चाचणीसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबासह संपर्कातील किंवा अतिजोखमीच्या व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी आवश्यक प्रिस्क्रिप्शन मिळत नसल्याने त्यांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे.

पालिका कारवाई करेल या भीतीने अनेक खासगी डॉक्टर रुग्णांना कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन देण्यास टाळाराल करीत आहेत. तर पालिका रुग्णालयांत गेल्यास क्वारंटाईन व्हावे लागेल या भीती पोटी संशयित रुग्ण सरकारी रूग्णालयात जाण्यास तयार होत नाहीत. 

 इंडियन मेडिकल असोसिएशन ने दिलेल्या माहितीनुसार कोरोना चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन दिलेल्या 20 डॉक्टरांवर पालिकेने आतापर्यंत कारवाई केली आहे. यातील अधिकतर डॉक्टर हे कुर्ला येथील आहेत. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींना या डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दिल्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च गाईडलाईन चे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई का करू नये अशी विचारणा करत पालिकेने या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

मात्र आयएमए ने सरकारसोबत चर्चा केल्यानंतर अखेर नोटीस मागे घेतली. याआधीच्या प्रिस्क्रिप्शन फॉर्म मध्ये गोंधळ असल्याने डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता तो फॉर्म रद्द करून आता नवीन फॉर्म तयार करण्यात आला आहे.

 पालिकेने काही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन लिहून न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहिती आयएमए चे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी दिली.

 नवीन नियमावलीनुसार सरकारी रुग्णालयांसह आता खासगी डॉक्टरांना ही कोविड चाचणीसाठी पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र त्यात नव्याने काही अटींचा समावेश करण्यात आला आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना आरोग्य तपासणीच्या 5 दिवसांपर्यंत कोविड19 ची लक्षणे नसतील तर कोविड चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देता येणार नाही. यातून आरोग्य कर्मचारी , गरोदर महिला , कॅन्सर आणि दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे. 

 पालिकेची नोटीस मिळाल्या डॉक्टरांपैकी एक असलेल्या  डॉ चेतन वेलानी यांनी सांगितले की , कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तीला त्यांनी चाचणी करण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले होते. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आपली चाचणी करून खात्री करावीशी वाटते. मात्र अश्या व्यक्ती या होम क्वारंटाईन असल्याने त्या घराबाहेर येऊन किंवा स्वता डॉक्टरकडे जाऊन आपली शारीरिक चाचणी कशी करणार याचे ही उत्तर प्रश्नानाने द्यावे असे ही ते पुढे म्हणाले.

अनेक कोरोना बाधितांचे नातेवाईक हे वयस्कर किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असतात. अश्या लोकांना अश्या लोकांना दवाखान्यांपर्यंत जाणे शक्य नसते. अश्या रुग्णांसाठी त्यांच्या इमारतींपर्यंत जाऊन आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देणे सुरू केल्याचे डॉ निखिल कुलकर्णी यांनी सांगितले. ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन लिहून देणे आपण टाळत असल्याचे डॉ कुलकर्णी पुढे म्हणाले.

एखादा रुग्ज आजारी असेल आणि त्याला डॉक्टरने चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑनलाइन कंसल्टेशन ला परवानगी असतांना ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन ला का नाही असा प्रश्न दर शाहिद बरमारे यांनी उपस्थित केला आहे.

एखाद्या रुग्णाला चाचणीची गरज असल्यास तसे प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यास काहिच हरकत नाही. मात्र अनेक खासगी डॉक्टर गरज नसतांना कोविड 19 चाचणी करण्यास सांगत असल्याचे पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ दक्षा शाह यांनी सांगितले. ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यास पालिकेने मनाई केली असून स्वता उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे ही त्या पुढे म्हणाल्या.

सरकारने नव्याने दिलेल्या फॉर्म मध्ये रुग्णाची संपूर्ण माहिती , रुग्णाची लक्षणे आणि  चाचणी करणाऱ्या  प्रयोगशाळेचे नाव लिहिणे आवश्यक आहे. फॉर्म मध्ये उल्लेख केलेल्या प्रयोगशाळेतच चाचणी करणे गरजेचे असून तेथे गर्दी असल्यास इतर प्रयोगशाळेत चाचणी करता येणार नाही. रुग्णाला दुसऱ्या प्रयोगशाळेत चाचणी करायची असल्यास डॉक्टरकडून तसे प्रिस्क्रिप्शन लिहून घ्यावे लागेल. मात्र या प्रकरणात रुग्णांसमोर अनेक अडचणी येत असून रुग्णांची फरफट होत आहे.

private doctors are not giving prescriptions to patients for corona testing 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT