Eknath Shinde  sakal media
मुंबई

नवी मुंबई : ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये सूट?

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

सुजित गायकवाड

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi mumbai) ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत (Property tax relief) देणाची तयारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दर्शवली आहे. नवी मुंबई मनपाने (BMC) नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याबद्दल नक्की सकारात्मक विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विकास आराखड्यात टाकलेल्या सिडकोच्या भूखंडांवरील (cidco land reservation) आरक्षणाचा पुन्हा अभ्यास करून आरक्षण हटवण्याबाबत निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. (Property tax relaxation possibilities on five hundred square foot homes as eknath shinde clarification)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका हद्दीतील ५०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नवी मुंबईत नाराजीची लाट उसळली आहे. याबाबत सकाळने मालमत्ता करसवलतीत दुजाभाव या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून नागरीकांचा संतापाला वाचा फोडली. नवी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी मालमत्ता कर सवलत आणि भूखंड आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकारांसमोर स्पष्टीकरण दिले. यावेळी शिंदे यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन नवी मुंबई मेट्रो, नेरुळ व बेलापूर जेट्टीसह इतर प्रकल्पांना भेटी दिल्या.

या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एस. एस. पाटील यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सिडकोच्या वतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच सिडकोच्या आवास योजनेतील घरांचे बांधकाम, प्रस्तावित नावडे येथील टाऊनशिप, नवी मुंबई विमानतळ, नैना विकास आराखडा, नेरुळ जलवाहतूक टर्मिनल, नेरूळ –बेलापूर-खारघर सागरी मार्ग, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी पुर्नप्रक्रिया, खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, वाशी येथील ठाणे खाडीपूल, पालघरमधील प्रशासकीय इमारती आदी प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

सिडकोच्या भूखंडांवरील आरक्षणाचा अभ्यास करणार

नवी मुंबईतील सिडको आरक्षित भूखंडावरील आरक्षणांची पुन्हा छाननी करून त्यानंतरच आरक्षण हटवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तोपर्यंत याआधी नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याचे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या विकास आराखड्यात सिडकोच्या भूखंडांवर महापालिकेने टाकलेले आरक्षम काढण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमिवर शिंदे यांनी घुमजाव केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT