मुंबई

आली लहर, केला कहर! चोराने चोरलं महावितरण कार्यालयातील हजेरीपत्रक, कर्मचाऱ्यांना लागला शॉक

प्रशांत घरत

पनवेल, ता.28 : एखाद्या कार्यालयात अथवा घरात कोणीच उपस्थित नसल्याची संधी साधत एखाद्या चोरट्याने महागड्या सामानावर हात साफ केल्याचे वृत्त तर आपण नेहमीच वाचत असतो. मात्र पनवेलमध्ये या उलट गौरी - गणपतीच्या सुट्टीमुळे बंद असलेल्या महावितरण विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रकच एका इसमाने चोरून नेलंय. 

अनोळखी इसमाने केलेला हा प्रकार कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाल्याने महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पत्रकाच्या झालेल्या चोरीची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

विक्षिप्त स्वभाव असलेल्या व्यक्ती कधी कशा वागतील याचा काहीच नेम नसतो. आशा स्वभावाच्या व्यक्तीचा फटका अनेकदा इतरांना बसत असतो अशाच एका विक्षिप्त स्वभावाच्या व्यक्तीने पनवेल शहरातील महावितरण विभागाच्या उपविभागीय कार्यलयातील हजेरी पत्रक उचलून नेत महावितरण विभागाच्या कर्मचार्यानाच झटका देण्याचा प्रकार केला आहे.

या सर्व प्रकाराबाबत पोलिसात तक्रार करण्यात आल्याने महावितरण विभागाच्या कारभारावर नाराज होऊन हे कृत्य करण्यात आले की हजेरी पत्रक चोरून नेण्याबाबत दुसरा कोणता हेतू होता या बाबतचा खुलासा संबंधित इसमच करू शकणार आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

psycho theft stolen attendance muster of mahavitaran office at panvel

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT