pulse oxymeter 
मुंबई

रुग्णांचे निदान वाढवण्यासाठी गेम चेंजिंग ठरणार पल्स ऑक्सीमीटर

भाग्यश्री भुवड

मुंबई ः कोरोना विरुध्दची लढाई आता निर्णयात्मक टप्प्यात आहे. जेव्हा रुग्ण एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूतमध्ये पोहचतो तोपर्यंत उशिर झालेला असतो, अशा प्रकारचे अनेक अनुभव गेल्या 2 ते 3 आठवड्यात समोर आले आहे. अशा रुग्णांना वाचवण्यात डॉक्टरांना यश येत नाही. मात्र हे चित्र जर बदलायचे असेल तर रुग्ण रुग्णालयात पोहचण्याआधी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कम्युनिटी हेल्थ वर्कर्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती नोंदवण्याची आहे. यावेळी हेल्थ वर्कर्ससोबत पल्स ऑक्सीमीटर या नावाचं एक मशीन दिलं जाईल. याद्वारे रुग्णाच्या बोटाच्या रक्तवाहिन्यांमधील ऑक्सीजनचे प्रमाण मोजले जाईल. या पल्स ऑक्सीमीटरबाबत राज्य कृती दल समितीचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी माहिती दिली.

पल्स ऑक्सीमीटर हे एक छोटंसं मशीन असून त्याच्या फटीत रुग्णाचे बोट ठेवायचे. रुग्णाच्या बोटावरच्या खालील भागावरील ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्ताच्या ऑक्सीजनचे प्रमाण मोजले जाईल आणि ते मशिनच्या वरच्या स्क्रीनवर आकड्यांच्या स्वरुपात दिसेल. सामान्यपणे हा आकडा 94 पेक्षा अधिक असायला हवा. 94 ते 100 या प्रमाणामध्ये हवा. ज्यावेळी हा आकडा 94 किंवा 90 पेक्षा कमी असेल किंवा त्याही पेक्षा कमी असेल तर त्यावेळी हा रुग्णाची अवस्था गंभीर होण्याची शक्यता असते. अशावेळी रुग्णाला तातडीने त्याच्या पुढच्या उपचारांसाठी नेण अत्यंत गरजेचे असते. जे रुग्ण 18 ते 54 वयोगटातील आहेत आणि ज्यांचे ऑक्सीजनचे प्रमाण 94 च्या आसपास आहे, अशा रुग्णांना तातडीने जवळच्या कोरोना केअर सेंटरमध्ये घेऊन जायला हवं; मात्र जे रुग्ण 55 वयोगटाच्या पुढच्या वयोगटातील असतील ज्यांच्यापैकी अनेकांना डायबिटीस, हायपरटेन्शन असे आजार असतील आणि त्यांच्या रक्तातील प्रमाण 94 पेक्षा कमी येईल अश्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले पाहिजे, असे डॉ. ओक यांनी म्हटलेय

महाराष्ट्रात 70 टक्के रुग्णांना रुग्णालयात तपासणी करेपर्यंत लक्षणे नसल्याचं ही समोर आले आहे. शिवाय अन्य कोणतीही लक्षणे नाहीत, श्वास घ्यायला ही त्रास होत नाही; मात्र शरीरातील प्राणवायूचे प्रमाण घटले आहे. मात्र त्याचा कोणताही बाह्य परिणाम रुग्णाला दिसत नाही. याला थोडक्यात 'सायलेंट हायपोक्सिया' असं म्हणतात.

पुढच्या दोन ते तीन दिवसांत हेल्थ केअर कर्मचाऱ्यांना संपूर्ण परिसर पिंजून काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि अशा ज्यांची हायरिस्क अशी अवस्था असेल, त्यांची एक वेगळी सूची तयार करण्यास सांगितले आहे. कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ही पायरी सर्वात महत्वाची आहे.
- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, राज्य कृती दल समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT