shrikant shinde sakal
मुंबई

वादविवाद, नाराजी बाजूला ठेऊन डॉ. शिंदे यांच्या प्रचाराला सुरुवात करा; मंत्री रवींद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे आहेत, तर अंतर्गत वादविवाद, नाराजी बाजूला ठेऊन प्रचाराला सुरुवात करा, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज डोंबिवली ब्राह्मण सभा सभागृहात झालेल्या भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं.

सकाळ वृत्तसेवा

दिवा : कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे आहेत, तर अंतर्गत वादविवाद, नाराजी बाजूला ठेऊन प्रचाराला सुरुवात करा, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज डोंबिवली ब्राह्मण सभा सभागृहात झालेल्या भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी- कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या आजच्या बैठकीला दिवा भाजप अध्यक्ष सचिन भोईर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाचे दिवा अध्यक्ष सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या, अशी मागणी करत पत्र भाजप प्रदेशाध्यक्षना पाठवलं होतं.

त्यामुळे या बैठकी आधीच भाजप - शिवसेनेतील धूसफूस मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कानावर गेलेली असल्याने ही बैठक मनोमीलनासाठी झालेली असावी असा अंदाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी बैठकीत अंतर्गत भाजप- शिवसेनेतील वादविवाद, नाराजी बाजूला ठेऊन खासदार डॉ. शिंदेच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत करावे असे, आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. या आवाहनानंतर या दिव्यातील भाजप - शिवसेना वादावर पडदा पडल्याचे समजत आहे.

या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच असणार आहे. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तयारी सुरू करा, असे चव्हाण यांनी आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.

याबाबत बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आचारसंहिता लागल्यापासून या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीएचे उमेदवार आहेत, त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी ही बैठक घेतल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदार संघात डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येण्यासाठी दिव्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी वादविवाद बाजूला ठेवून प्रचारात सामील व्हावे. अन् खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सगळ्यांना मदत करावी असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT