मुंबई

रेमडीसीवीरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, इंजेक्शनची गुणवत्ता तपासण्याची मागणी

मिलिंद तांबे

मुंबई:  कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी रेमडीसीवीर इंजेक्शनला मोठी मागणी आहे. मात्र अनेक रूग्णांना हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम साधत नसण्याचे समोर आले आहे. त्यामुळे या इंजेक्शनच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण आले आहे. याप्रकरणी राज्य अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून इंजेक्शनची गुणवत्ता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. 

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमेडीसीवीरसह टॉसिलीझुमॅब, हायड्रोक्लोरोक्वीन, इटॉलिझुमॅब ही औषधं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. यातील रेमेडीसीवीर या औषधाला सर्वाधिक मागणी आहे.  हे औषध स्वस्त आणि परिणामकारक असल्याने या औषधाला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसते. मात्र आता या औषधाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. 

ऑल फूड एँड ड्रग्स लायसेंस होल्डर फाऊंडेशनने राज्य अन्न व औषध प्रशासनाला पत्र लिहून रेसेडीसीवीर औषधाच्या गुणवत्तेबाबत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारी नुसार कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी या औषधाचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र अनेक रूग्णांना हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम साधत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या औषधाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने रेमेडीसीवीरची मागणी ही गेल्या 7 महिन्यांपासून प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मागणी नुसार औषधाची निर्मिती आणि पुरवठा करण्यासाठी औषध कंपन्यांवर मोठा दबाव आहे. त्यातूनच औषधाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्या असल्याची शक्यता AFDLHF चे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी वर्तवली आहे.

रेमेडीसीवीर या औषधाची कालबाह्यता ही केवळ 90 दिवसांची आहे. शिवाय या औषधासाठी एक खास प्रकारच्या तापमानाची गरज देखील असते. त्यामुळे या औषधाची गुणवत्ता प्रत्येक बॅचनुसार तपासणे महत्वाचे आहे. मात्र एफडीएने या औषधाचा एकही नमूना तपासला नसल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. त्यामुळे रेमेडीसीवीर औषधाच्या प्रत्येक बॅचची गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी ही पांडे यांनी केली आहे. 

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

The quality of Remedesivir injection has been questioned

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT