ठाणे : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून प्रत्यक्षात आलेली निवडणूक रोखे योजना म्हणजे जगातील सर्वांत मोठे खंडणी रॅकेट आहे,’’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. या रोख्यांद्वारे मिळालेल्या पैशांचा वापर करूनच भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, असा आरोपही राहुल यांनी केला. (Rahul Gandhi says BJP divides Shiv Sena Ncp with money getting from Electoral Bonds)
अखेरच्या टप्प्यावर आलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आज भिवंडी येथे दाखल झाली. निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यांबाबतची माहिती जाहीर केल्याच्या आणि निवडणूक रोख्यांचा सर्वाधिक फायदा भाजपला झाल्याचे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडले. (Latest Marathi News)
राहुल गांधी म्हणाले,‘‘राजकारणातील अर्थव्यवहार पारदर्शक करण्यासाठीच निवडणूक रोख्यांची योजना आणल्याचे पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. आता मात्र, देशातील बड्या कंपन्यांकडून खंडणी वसूल करण्याचा हा मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. या योजनेद्वारे भाजपला पैसे देण्यास मोठ्या कंपन्यांना भाग पाडण्यात आले. जगातील हे सर्वांत मोठे खंडणी रॅकेट आहे. या प्रकरणी तपास होईल, अशी मला आशा आहे.’’
काही कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षालाही देणगी दिल्याचे आणि त्यांनाही काँग्रेसशासित राज्यांमध्ये कंत्राटे मिळाल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले,‘‘ भाजपविरोधातील पक्षाची सत्ता असलेल्या राज्यातील कोणत्याही सरकारचे देशपातळीवरील कंत्राटांवर नियंत्रण नाही; तसेच प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यांच्यासारख्या तपास यंत्रणाही त्यांच्या ताब्यात नाहीत. (Marathi Tajya Batmya)
कंपन्यांना मिळालेली कंत्राटे आणि त्यांनी आम्हाला दिलेला निधी यांचा काहीही संबंध नाही. उलट, कंत्राटे मिळाल्यावर काही महिन्यांत कंपन्यांनी भाजपला निधी दिल्याचे किंवा गुन्हे दाखल झाल्यावर निधी दिल्याचे दिसून आले आहे.’’ भाजपला याद्वारे प्रचंड पैसा मिळाला असून याचाच वापर करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आली, तसेच विरोधकांची सत्ता असलेली सरकारे पाडली गेली, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.