Rahul Narwekar sakal
मुंबई

Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांना न्यायालयाने ठोठावला तीन हजारांचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Court Order: भाजपने बेस्ट विरोधात आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता

सकाळ वृत्तसेवा

Covid 19 | कोरोना काळात वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपच्या २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीला राहुल नार्वेकर यांनी दांडी मारल्यामुळे न्यायालयाने त्यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोविडच्या महामारीत अनेकांना नोकरी, व्यवसायपासून मुकावे लागले. पोटाची खळगी भरण्याचे वांदे असतानाच बेस्ट प्रशासनाने भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवली होती. त्याविरोधात भाजपने बेस्ट विरोधात आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता.

याप्रकरणी कुलाबा पोलिसात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार अतुल शहा व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्वांवर आरोप निश्चिती करण्यात आली असली तरी संबंधितांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुरु आहे. सध्या साक्षीदारांची उलटतपासणी घेतली जात आहे.

शुक्रवारच्या सुनावणीला राहुल नार्वेकर हे गैरहजर राहिले. मागील तीन वर्षांपासून खटला सुरु असून उच्च न्यायालयाने जलदगती सुनावणीचे निर्देश दिले असूनही नार्वेकर यांनी गैरहजेरी लावल्यामुळे न्यायालयाने नार्वेकर यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ८ जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT