Rahul Shewale Uddhav Thackeray and Sanjay Raut 
मुंबई

राहुल शेवाळे मानहानी खटला प्रकरण! उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाने ठोठावला 'इतका' दंड

Rahul Shewale defamation case : मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी या दोघांनी अर्ज केला होता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 2 हजार रुपये दंड ठोठावला आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपये दोन आठवड्यांत जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे दिले आहेत.

मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी या दोघांनी अर्ज केला होता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहेत.

प्रकरण काय?

शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर राहुल शेवाळे हे शिंदे गटामध्ये गेले होते. त्यानंतर ठाकरे गटाने शेवाळे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. 'सामना' वृत्तपत्रामधून राहुल शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय आहे असा दावा मुखपत्रामध्ये करण्यात आला होता.

राहुल शेवाळे यांनी आरोप फेटाळून लावत आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. २९ डिसेंबर २०२२ मध्ये हा लेख लिहिण्यात आला होता. त्यानंतर ३ जानेवारी २०२३ रोजी शेवाळे यांनी ठाकरे आणि राऊत यांना नोटीस पाठवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Manifesto 2024: मुंबईत अमित शहांची पत्रकार परिषद सुरु असताना तरुण उठला अन्......

Nitin Gadkari: भाजपचं पीक वाढलंय, रोग लागतो आता फवारण्याची गरज; नितीन गडकरींनी का व्यक्त केली चिंता?

BJP Manifesto 2024: भाजपच्या जाहीरनाम्यात 'विकसित महाराष्ट्र' संकल्पना; शेतकऱ्यांसाठी हमीभाव, बहिणींना भेट म्हणून २१०० रुपये

Dharashiv Assembly Election 2024 : धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत थेट लढत!

Star Pravah : मृणाल दुसानिस आणि ज्ञानदा रामतीर्थकरचा मालिकेत कमबॅक ; नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस

SCROLL FOR NEXT