Mumbai Rain sakal
मुंबई

Mumbai Rain: अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, महामार्ग 6 तास ठप्प

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

Khopoli Highway : मुसळधार पावसामुळे रविवारी (ता.14) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली परिणामी वाकण पाली राज्य महामार्गावर पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला रस्त्यावर सखल भागात पाणी भरले होते.

यामुळे सकाळपासून येथील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल 6 तास ठप्प होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच याच मार्गावर बलाप गावाजवळही रस्त्यावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक खोळंबली होती. दुपारी एक नंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली.

पालीवरून वाकणकडे व वाकण वरून पालीकडे येणारी वाहतूक बंद झाली होती. खाजगी वाहने एसटी बस ट्रक टेम्पो आदी मालवाहू वाहने अडकून पडली होती. रविवार असल्याने शाळा कॉलेज तसेच सरकारी कार्यालय यांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी व चाकरमानी या कोंडीतून सुटले. मात्र इतर प्रवासी व स्थानिक नागरिकांचे हाल झाले.

पाली-वाकण मार्गावरच बलाप गावाजवळ वळणावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. या पाण्यातून काही वाहने धोकादायकपणे जात होती. मात्र छोटी वाहने अडकून पडली होती.

वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. पाली व जांभूळपाडा अंबा नदी आणि भालगूल येथे मोठे पूल बांधण्यात आले. तसेच पाली अंबा नदीवरील एक पूल पूर्ण झाला आहे.

तर दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण व पुलामुळे पावसाळ्यात हा मार्ग सोयीचा व सुखकारक होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र पावसाळ्यामध्ये या सगळ्याचे बिंग फुटले आहे. पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवासी नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. त्यांची गैरसोय होत आहे.

पाली अंबा नदीवरील पूल बिनकामाचा

अंबा नदीवर नुकताच उंच व रुंद असा मोठा पूल बांधण्यात आला आहे. आणि एका बाजूच्या मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या आधी आंबा नदीवरील जुना पूल हा रुंद व उंचीने छोटा होता. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाऊन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहतूक ठप्प होत होती. नवीन रुंद व उंच पूल बांधल्यामुळे आता ही समस्या संपुष्ठात येऊन पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला व प्रवाशांना होती.

मात्र घडले भलतेच, नवीन मोठा व रुंद पूल झाला मात्र त्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता हा खाली असल्यामुळे आता पुलावरून पाणी न जाता या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणी साचत आहे. आणि परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होत आहे. एमएसआरडीसी प्रशासनाने या दोन्ही बाजूला मोरी टाकणे किंवा उंच रस्ता करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्यामुळे हकनाक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

खुश्कीचा मार्ग

वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. हा मार्ग सुस्थितीत असल्यामुळे अनेक प्रवासी व वाहने याचा वापर करतात. मात्र पाली अंबा नदी पूल झाला असूनही पुलाच्या दोन्ही सखल बाजूला पाणी साचल्यामुळे प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून पडली व त्यांची गैरसोय झाली.

आजूबाजूच्या शेतात पाणी

अंबा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेले त्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले.

अंबा नदीवरील पूलाच्या दोन्ही बाजूकडील पाणी असताना नागरिकांनी खबरदारी म्हणून सदर पुलाचा वापर करू नये. येथील वाहतूक तूर्तास थांबवण्यात आलेली आहे. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. या ठिकाणी पोलीस देखील तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली-सुधागड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Sports News on 15th October 2024: भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात ते कोल्हापूरच्या कन्येने जिंकले रौप्यपदक

SCROLL FOR NEXT