मुंबई

सावित्री नदीतील मृतदेह पुण्यातील व्यावसायिकाचा; हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा अंदाज 

सुनिल पाटकर

महाड - महाडजवळील ईसाने कांबळे गावच्या हद्दीत सावित्री नदीच्या पात्रामध्ये शनिवारी (ता. 6) सकाळी आढळलेला मृतदेह पुण्यातील पिंपरी येथील एका व्यावसायिकाचा असल्याचे निष्पन्न झाले. या व्यावसायिकाची हत्या करून त्याचा मृतदेह पुलावरून सावित्री नदीत फेकण्यात आला होता. 

भोराव पुलाजवळ सावित्री नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान या मृत व्यक्तीच्या डोक्‍यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे व त्याला नदीच्या पुलावरून पात्रात फेकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच या मृतदेहाची ओळख पटवली आहे. ही व्यक्ती पिंपरी येथील व्यावसायिक असून त्यांचे नाव आनंद उनवणे असे आहे. आनंद उनवणे हे एफएफआय चिट फंड या कंपनीचे मालक असल्याने त्यांची हत्या व्यवसायातून झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण आले असून पिंपरी-चिंचवडमध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल झाली आहे.

त्यानुसार आनंद उनवणे यांनी आपली व्यवस्थापिका सुनीता यांना आपल्या बॅंक खात्यातून 40 लाख रुपये काढण्यास सांगून ते ड्रायव्हरमार्फत घरी पाठवून आपल्या गाडीच्या पुढील सीट खाली ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी फोन बंद केलेला होता; परंतु ही चाळीस लाखाची रक्कम गायब झाल्याचे तसेच आनंद उनवणे यांच्या घरातील दागिनेही गायब झाल्याचे व्यवस्थापिकेच्या निदर्शनास आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्या दिवसांपासून आनंद उगवणे या परिसरातून गायब झालेले होते. 

पत्नीपासून घटस्फोट 
व्यावसायिक आनंद उनवणे यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला असून ते दुसऱ्या एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेदेखील समोर आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT