महाड - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा, कोणतेही विघ्न येऊ नये, वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिस सज्ज झाले आहेत. पळस्पे फाटा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या ४५० किलोमीटर अंतरापर्यंत महामार्ग सुरक्षा गस्त पथकातील १९ अधिकारी आणि २२६ वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात आहेत.
त्सवासाठी गणेशभक्त लाखोंच्या संख्येने खासगी, सावर्जनिक वाहनांनी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करत कोकणात दाखल होतात. त्यांचा प्रवास निर्विघ्न व्हावा, यासाठी खेड तालुक्यातील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे तर पळस्पे फाट्यापासून इंदापूरपर्यंत एकेरी रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, गुजरातमधून गावी जाणारे प्रवासी आपली वाहने याच मार्गावरून नेऊ शकतील.
जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर आणि कोलाड या ठिकाणी लोणेरे फाटा दरवर्षी वाहतूक कोंडी होते. यंदा प्रशासनाने कोंडीला सोडवण्यासाठी आतापासून तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-भरणा नाका, चिपळूण शहराजवळील बहादूर शेख नाका या दोन ठिकाणीही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिस तैनात आहेत.
महामार्ग वाहतूक पोलिस शाखेच्या पळस्पे फाटा, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबा, कसाल अशा सात शाखा असून १९ अधिकारी आणि २३६ वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एखादा अपघात झाला तर जखमींसाठी रुग्णवाहिका तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी क्रेनही सज्ज आहेत.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षतेच्या दृष्टीने शक्यतो दिवसा प्रवास करावा. वेग मर्यादेवर नियंत्रण ठेऊन वाहन चालवावे. प्रवासात अडचण निर्माण झाल्यास जवळच्या वाहतूक शाखेत संपर्क साधावा किंवा अडचणीच्या परिस्थितीमध्ये ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.
संजय भोसले, उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलिस, महाड
चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न!
रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखावी, मुंबई-गोवा व खोपोली मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी रायगड पोलिसांच्या वतीने सर्व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर, गावनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोलवी येथे नुकतीच यासंदर्भात बैठक घेउन मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सव काळात तीन दिवस महामार्गावर ४०० हुन अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताला असणार आहेत. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, वेगमर्यादा पाळावी, वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी चालकांना करण्यात आले आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी महामार्गावर १० सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले असून, जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पोलिसांना जॅकेट, रिफ्लेक्टर, बॅरिकेट, आधुनिक मॅपद्वारे दिशादर्शक तक्ते देण्यात आले आहे. कोकणात जाताना रायगड जिल्ह्यातून १५१ किलोमीटरचा महामार्ग लागतो. प्रवाशांशी सौजन्याने बोलावे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची, सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहनही घार्गे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.