आकाशकंदील 
मुंबई

भाताच्या लोंब्यांपासून आकाशकंदील! 

अभय आपटे


रेवदंडा ः सध्या जिल्हाभरात अनेकांची दिवाळीसाठी रेडीमेड साहित्य, फराळाची खरेदी करण्याकडे कल आहे. शहरी भागात दिवाळीचा मोठा जल्लोष असतो. ग्रामीण भागातही दिवाळी सण साजरा करण्याचे अलीकडे "फॅड' वाढले आहे. आकाशकंदील, रांगोळी आणि इतर साहित्यांनी बाजारपेठाही सजल्या आहेत. अशा स्थितीत अलिबाग तालुक्‍यातील चौल-भाट गल्लीमधील एका निसर्गवेढ्या तरुणाने बनविलेले भाताच्या लोंब्यांपासूनचे आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सध्या निवडणुकीचा माहौल थंडावला असून, नागरिकांनी दिवाळी सण साजरा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दिवाळीच्या खरेदी साहित्याने दुकानेही सजली आहेत. कोणी रेडीमेड मिळणारे साहित्य खरेदी करीत आहे, तर कोणी स्वतः मेहनत घेऊन फराळ व इतर साहित्य बनवतो आहे. प्रत्येक मनुष्य हा काहीतरी नावीन्याच्या शोधात असतो. रांगोळ्या, घरासमोर पणत्यांची आरास, आकाशकंदील किंवा रंगीबेरंगी चांदण्या यात काहीतरी प्रत्येक जण विविधता शोधत असतो.

अलिबाग तालुक्‍यातील चौल-भाट गल्लीमधील निसर्गाची ओढ असलेले 36 वर्षीय राकेश काढे यांनी चक्क भातपिकाच्या लोंब्यांपासून आकाशकंदील बनवले आहेत. त्यांची आकर्षक मांडणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या आकाशकंदिलांना मागणीही आहे. आजही जिल्ह्यातील बरेच नागरिक कंदील बनवतात. त्यात बांबूच्या काठ्यांचा वापर करून बनवलेले कंदील सर्वांसाठी आकर्षण ठरायचे; मात्र भाताच्या लोंब्यांपासून बनवलेले हे कंदील काही औरच, असे म्हणावे लागेल. 

500 ते 600 रुपयांना विक्री 
राकेश काढे यांना एक आकाशकंदील बनवायला चार-पाच तास लागले. त्यासाठी चांगल्या स्थितीतील भाताच्या लोंब्यांची निवड केली. त्यांची व्यवस्थित मांडणी करून कल्पकदृष्ट्या हे आकाशकंदील बनविले. या कंदिलांची 500 ते 600 रुपयांना ते विक्री करीत आहेत. त्यांचा हा पहिलाच प्रयोग आहे. अशा कंदिलांसाठी त्यांच्याकडे मागणीही वाढू लागली आहे. अजून 12 स्थानिकांनी मागणी केली आहे. याअगोदर अनेक वर्षे त्यांनी नवीन भाताची घराच्या दरवाजावर लावण्यासाठी तोरणे बनवली होती. दीपोत्सवातही या तोरणांना मागणी असते. 

लोब्यांपासून कंदील बनविण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. सध्या माझ्याकडे अनेक जण येऊन कंदिलांची मागणी करतात. पुढच्या वर्षी नक्कीच जास्त कंदील बनविण्याचा विचार आहे. 
राकेश काढे, चौल, भाट गल्ली रहिवासी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT