मुंबई

Raigad News : समुद्रकिनारी सापडलेल्‍या चरसचे गूढ कायम

रायगड, रत्नागिरीतून १८.३६ कोटींचे अमली पदार्थ; तपास केंद्रीय यंत्रणांकडे

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग - रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर आतापर्यंत साधारण १८ कोटी ३६ लाख रुपयांचे चरस सापडले. केंद्रीय यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू असला तरी अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

सापडलेल्या पाकिटांवर ‘अफगाण प्रॉडक्ट’ अशी अक्षरे लिहिली आहेत. अशा प्रकारे समुद्रातून वाहून आलेल्या चरसची पाकिटे गुजरातच्या किनाऱ्यावरही सापडली होती. यामुळे यात आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ११) दक्षता समितीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत श्रीवर्धनमधील सदस्यांनी उपस्थित केलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत माहिती दिली.

चरस तस्करीच्या प्रकरणावरून रायगडमधील किनारपट्टी असुरक्षित असल्‍याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर २७ ऑगस्टपासून तीन दिवसांत ९ ठिकाणी साधारण २०० किलो चरसची पाकिटे सापडली आहेत. यातील ७ ठिकाणे श्रीवर्धन तालुक्यातील आहेत.

यामुळे चरस तस्करीचे केंद्रबिंदू श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या आसपासचे बंदर असावे, असा रायगड पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिस आणि सागरी सुरक्षा विभागाकडून किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, शोधमोहिमही राबवली परंतु ठोस धागेदोरे सापडले नाहीत.

साधारण एक किलोची १७५ पाकिटे रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनारी आढळली आहेत.

सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यात १४ ऑगस्टनंतर दापोली आणि गुहागर या दोन पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात २४९ किलोची चरसची पाकिटे सापडली होती. आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यात ४५८ किलो चरस सापडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चरस सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सापडलेली सर्व पाकिटे समुद्रातून वाहून आली होती. यातील काही खाऱ्या पाण्याने खराब झाली असून सर्व मुद्देमालाची किंमत १८ कोटींच्या आसपास आहे.

समुद्रकिनारी जी पाकिटे सापडलेली आहेत, त्या पाकिटांचे पॅकेजिंग सारखेच असून बहुतांश माल पाण्यात भिजला आहे. यासंदर्भात किनारपट्टीवरील गावांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली आहे, परंतु ठोस धागेदोरे सापडलेले नाहीत. या प्रकरणी सध्या केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत.

- सोमनाथ घार्गे, पोलिस अधिक्षक, रायगड

शोधमोहिमेत सापडले २४९ किलो चरस

१४ ते १७ ऑगस्टदरम्‍यान कर्डे, लाडघर, केळशी, कोलथारे, मुरूड, बुरोंडी, दाभोळ आणि बोऱ्या किनाऱ्यांवर चरसची पाकिटे सापडली. दापोलीत सीमा शुल्‍क विभागाचे कर्मचारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला किनाऱ्यावर गस्त घालत होते.

त्या वेळी कर्डे किनाऱ्यावर १० संशयित पाकिटे सापडली. त्यांचे वजन १२ किलो होते. यानंतर केळशी आणि बोऱ्या किनाऱ्यांवर शोध मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात पुढील पंधरा दिवसात सातत्याने चरसची पाकिटे सापडली.

कोलाडमध्ये पाच लाख ३४ हजारांचे चरस जप्त

रोहा (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील रोहा-कोलाड रस्त्यावर एका हॉटेलजवळ रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले तर एकजण फरार झाला. तालुक्यातील कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेलजवळ एक व्यक्‍ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार सहायक निरीक्षक नागेश कदम, सहायक फौजदार दीपक मोरे, हवालदार विकास खैरनार, रूपेश निगडे, सुदीप पहेलकर, शिपाई अक्षय जगताप, स्वामी गावंड, ओमकार सोंडकर यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई करीत १०६८ ग्रॅम वजनाचे पाच लाख ३४ हजार रुपये किमतीचा चरस जप्त केले. या वेळी देवेंद्र जयदास पाटील (२६), भारत आत्माराम पालेकर (३०, रा. जीवनाबंदर, श्रीवर्धन) यांना अटक केली तर राजन पांडुरंग चेवले हा आरोपी फरार झाला.

रायगडमध्ये सापडलेले चरस

तारीख समुद्रकिनारा पाकिटे वजन किंमत

२७ ऑगस्ट जीवना ९ १० किलो ४१ लाख

२८ ऑगस्ट मारळ ३० ३५ १. ४२ कोटी

२८ ऑगस्ट सर्वेसागर २४ २६ किलो १. ७कोटी

२९ ऑगस्ट कोंडिवली २८ ३३ किलो १. ३३ कोटी

२९ ऑगस्ट दिवेआगर, आदगाव ४६ ५५ किलो २. २२ कोटी

३० ऑगस्ट कोर्लई १९ २४ किलो ९९. ६३ लाख

३१ ऑगस्ट आक्षी ६ ६ किलो २६ लाख

३१ ऑगस्ट नानिवली १ १ किलो ४ लाख

३१ ऑगस्ट श्रीवर्धन १२ १४ किलो ५९ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT